स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या नांदेड उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कदम तर मुस्लीम आघाडी जिल्हाध्यक्षपदी शेख शकील

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा
           नांदेड : स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्ह्याच्या वतीने दि. 4 रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
            या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील उर्वरित कार्यकारणी जाहीर करण्यात आली स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बालाजी पाटील कदम तर मुस्लिम आघाडी जिल्हाध्यक्षपदी शेख शकील व विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष ग्रामीण वैभव पा.राजूरकर, वि.आ. महानगराध्यक्ष नांदेड अनिल पाटील तेलंग, जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय क्षीरसागर, उत्तर वि.आ. उपाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सरचिटणीस हरिभाऊ जाधव, वि.आघाडी संघटक विजय मोरे, हदगाव शहर अध्यक्ष गजानन भाऊ जासुद, तालुका संघटक डी जगताप पाटील तळेगावकर यांची निवड प्रदेशध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत मुळे, विभागीय संघटक गणेश काळम, प्रदेश संघटक विलास पाटील इंगळे, जिल्हाध्यक्ष सुनील पा.कदम, हनमंत पा.वाडेकर, मंगेश कदम, सदा पा.पुयड, शशिकांत पाटील, गजू पा.सांगवीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वरील निवड करण्यात आली.
                  प्रदेशाध्यक्ष माधवराव पा.देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मोठ्या उत्साहात पार पडली असून या बैठकीला नांदेड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व संघटनेचे ध्येयधोरणे समजून सांगितले. जिल्हाध्यक्ष सुनील पा.कदम, हनमंत पा.वाडेकर यांनी सर्व तालुकाध्यक्षांना प्रत्येक तालुक्यामध्ये दुष्काळी संदर्भात निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधून घेण्याचे काम करावे, असे सांगितले.
                  या बैठकीला प्रकाश घोगरे, नवनाथ जोगदंड, शिवाजी जाधव, बालाजी कऱ्हाळे, अमोल वानखेडे, चंद्रकांत वन्नाळे, वैभव भिसीकर, बजरंग जिगळेकर, श्री पा.खराणे, कैलास कदम, शिवा कदम, गंगाराम कदम, शिव पुयड यांच्यासह स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी जाधव यांनी केले, तर आभार मंगेश कदम यांनी मानले.