पंधरा मिनिटांतच उरकला पालकमंत्र्यांनी अतिवृष्टी नुकसान पाहणी दौरा

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 मुखेडमध्ये राज्य महामार्गवरील सलगरा फाटा येथील शेतात केली पाहणी 

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
               मुखेड तालुक्याती मौजे सलगरा फाटा येथे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दि. ३ नोंहेंबर रोजी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पण हा पाहणी दौरा १० ते १५ मिनिटातच ऊरकून  ते नांदेड येथे रवाना झाले असल्याने तालुक्याती शेतक-यांत नाराजी दिसून आली.
           मुखेड तालुक्यात मागील चार वर्षांपासून कोरडा दुष्काळ पडला पण या वर्षी पावसाच्या सततच्या कहरामुळे ओला दुष्काळ निर्माण झाला आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या जोरदार पावसाने हिसकावून नेले.यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर या ओल्या व कोरडया दुष्काळात  तालुक्यातील शेतकरी राजा सापडला असुन मागील ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने मोठा कहर करुन  शेतकऱ्याचे ज्वारी, सोयाबीन, कापूस व तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुसकान ग्रस्त भागातील पिकाची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील मौजे सलगरा फाटा येथे पालकमंत्री रामदास कदम, जिल्हाधिकारी अरुण कुमार डोंगरे, मुख्यकार्यकारी अधिकारी  अशोक काकडे, आमदार राम पाटील रातोळीकर, आ.बालजी कल्यानकर, माजी आ. सुभाष साबने, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, तहसीलदार काशिनाथ पाटील, यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाचे नुकसान झालेल्याची पाहणी केली.
                तालुक्‍यात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालेली पाहणी करण्यासाठी येणार असल्यांचे आदल्या दिवशी समजल्याने शेतकरी आप आपल्या शेतात मंत्री आमच्या शेताचे पाहणी करायला येतील या आशेपोटी वाट पहात बसले होते पण मंत्रीमहोदयांनी मुखेड तालुक्यातील सलगरा फाटा येथील राज्य महामार्गाच्या बाजूला असलेल्या शेतीतील नुकसान  झालेल्या पिकाची दहा ते पंधरा मिनिटातच पाहणी करून आपला दौरा आटोपल्याने तालुक्यातील उर्वरित शेतकरी निराश होऊन संताप व्यक्त करीत असल्यांची चर्चा शेतक-यांच्या तोंडून ऐकवयास पहाते
   यावेळी नायब तहसीलदार पि.डी.गंगर, नायब तहसीलदार मकरंद दिवाकर,सा.बा.वी.चे उपाभियंता ओमप्रका बेंबरे, तालुका कृषिअधिकारी शिवाजी शितोळे, पेशकार जि.एस. शेख, जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, आनंद बोंढारकर, उमेश मुंडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बालाजी कबनुरकर, शहराध्यक्ष नागनाथ लोखंडे,  मंडळ कृषि अधीकारी विशाल बिराडे, मंडळ अधिकारी एम.के. मेकाले तलाठी  डि.एल.भुरेवार, कृषीडप्रवेशक जे.डी.पवार, कृषी सहाय्याक  एस. एम फुलारी,  यासह शेतकरी उपस्थित होत.