अतिवृष्टीचे नुकसान व कर्जास कंटाळुन मुखेडात शेतकऱ्याची आत्महत्या

Uncategorized ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

                    मुखेड तालुक्यातील वर्ताळा येथील शेतकरी गोविंद माणिका आगलावे वय 29 वर्ष यांनी आपल्या राहत्या घरी वर्ताळा येथे तुळईला दोरीने बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 31 रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास घडली.

         सविस्तर वृत्त असे की, गोविंद माणिका आगलावे या तरुण शेतकयाने आपल्या शेतात मोठया जोमाने पिक लावले होते पण हातात आलेले पिक पावसाने अक्षरश: वाया गेले त्यामुळे आर्थिक संकटाला भिऊन व कर्जाचे ओझे कमी होता होईना व आपले कुटूंब कसे पोसावे अशा परिस्थितीला कंटाळुन पत्नी ज्योती आगलावे दिपाळीसाठी माहेरी गेली असता गोविंद आगलावे यांनी राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयताचे चुलत भाऊ राम उध्दव आगलावे यांनी दिली.

        सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अनिता ईटुबोने , पोलीस जमादार नागोराव पोले, पोलीस कर्मचारी मारोती मेकलवाड यांनी पंचनामा केला.

     मयत शेतकरी गोविंद माणिका आगलावे घरात कर्ता पुरुष होता त्याच्या जाण्याने अख्ख कुटूंब उघडयावर पडले असुन त्याच्या पश्चात पत्नी, एक लहाण मुलगा, पाच बहीणी आहेत. त्याच्या अशा जाण्याने कुटूंबासहीत गावावर शोककळा पसरली असुन शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी नागरीकांतून होताना दिसत आहे.

       मयत गोविंद आगलावे यांचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे करण्यात आले असुन मुखेड पोलिसात भा.द.वि. 174 सीआरपीसी नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असुन याचा तपास पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर व पोलिस उपनिरीक्षक अनिता ईटुबोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार नागोराव पोले हे करीत आहेत.