अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे गावनिहाय प्रत्यक्ष पाहणी       करुन अहवाल सादर करा – तहसिलदार पाटील

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
दोन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

जुलै , ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर २०१९ या महिन्या पासुन सुरू  झालेल्या पावसाने मुखेड तालुक्यातील शेती जलमय केली असुन  या दमदार पावसामुळे तालुक्यातील पाण्याचा दुष्काळ तात्पुरता मिटला पण तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने शेतक­ऱ्यांचे नुकसान झालेल्या गावनिहाय पिकांची पाहणी करुन संबंधीत कर्मचारी व अधिका­ऱ्यांनी दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे मुखेड तहसिलदार काशिनाथ पाटील यांनी दि ३० रोजी घेण्यात आलेल्या अतिवृष्टी उपाय योजने संदर्भातील बैठकीत सुचना केल्या.

अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके कुजली असुन अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका ऊडीद, मूग, सोयाबीन, तुर तसेच कापसाच्या पिकाला बसला आहे. त्यामुळे हाताला आलेली पिके पावसाने गिळकृंत केल्याने शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला असुन तोंडाशी आलेला घास गेल्याने यामुळे शेतकरी मोठया अडचणीत सापडलेला दिसत आहे.

पंचनामे करण्याची मागणी
पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळत रडवले असुन आंतरमशागतीची कामे तसेच कीड व रोगनियंत्रणासाठी फवारणी उरकुन घेण्यासाठी सुध्दा पावसाने शेतक­यांना वेळ दिला नाही. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान अतोनात झाले असुन महसूल विभागाने पंचनामे करू न शेतक­यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्याकडे केली होती.