कै.आ.गोविंदराव राठोड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अलोट जनसागराने घेतले समाधीचे दर्शन 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
 ज्ञानेश्वर डोईजड
      मुखेड तालुक्याचे लाडके नेते कै .आ.गोंविदराव राठोड यांच्या पाचव्या पुन्यस्मरण दिनानिमित्त विवीध कार्यक्रम पार पडले. यावेळी तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच अलोट जनसागराने कै.आ.गौविंदराव राठोड यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले.
      मुखेड तालुक्याचे आमदार कै. गोविंदराव राठोड यांचे पाच वर्षाखाली आजच्या दिवशी दुख:द निधन झाले. त्यांच्या दि 26 आक्टोबर रोजी त्यांची पुन्यतिथी आहे. आमदार डॉ. तुषार राठोड व मा. नगराध्यक्ष गंगाधर राठोड यानी आपल्या वडीलांच्या कै. गोविंदराव राठोड यांच्या स्मरणार्थ  कमळेवाडी फाटा येथे समाधी स्थळावर भव्य असे स्मारक ऊभे केले आहे दरम्यान कै आ. गोविंदराव राठोड यांच्या पुन्यतिथी निमीत्त त्यांच्या समाधीचे ब्रम्हवृंदाच्या मंत्रोपच्चारासह आमदार डॉ तुषार राठोड, मा नगराध्यक्ष गंगाधर राठोड यानी विधीवत पुजन केले. यानतंर अनेकांनी कै. गोविंदराव राठोड यांच्या समाधीचे दर्शन घेवुन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
             यावेळी मा.आ.किशनराव राठोड, मा आ. अविनाश घाटे, मा. आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, काँग्रेसचे जेष्ठ नेते शेषेराव चव्हाण,
 जि. प. सदस्य व्यकंटराव पाटील गोजेगावकर,संतोष राठोड, आरपिआय जिल्हाध्याक्ष गौतम काळे, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, , पवन पोतदार, जैनोदिन पटेल, प. सदस्य मनोज गोंड, , नगरसेवक अनिल जाजु, जगन्नाथ कामजे, नगरसेवक शिवा मुदेवाड, जगदीश बियानी, सुशील पत्की, सह अनेकांची ऊपस्थिती होती.दरम्यान यावेळी राठोड परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचे अनेकांनी लाभ घेतला  .