भाजपाच्या सगळ्या अडचणी मी समजून घेणार नाही – उद्धव ठाकरे….मलाही पक्ष वाढवायचा आहे

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मराठवाडा

 

“लोकसभेआधी शिवसेना आणि भाजपा यांच्यात ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता. मात्र विधानसभेच्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी मला विनंती केल्यामुळे मी त्यांची अडचण समजून घेतली. मात्र प्रत्येकवेळी मी सगळ्या अडचणी समजून घेणार नाही, मलाही माझा पक्ष वाढवायचा आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. याचसोबत सत्तास्थापनेची आपल्याला कोणतीही घाई नसून सर्व पर्याय खुले असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत सर्व मतदारांचे आभार मानले.