मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांंच्या खात्यातून एक हजार रुपये कपात…बँकेची तुघलकीशाही..

नांदेड जिल्हा मुखेड
बा-हाळी : पवन कँदरकुंठे
                मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील दि.नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.येथील कर्मचारी शेतकऱ्यांंचा दुष्काळी निधी असो अथवा पिक विमा असो आणखी कोणतेही सरकारी निधी असो  शेतकऱ्यांंच्या आलेल्या रकमेतुन एक ते दीड हजार रूपये कापुन घेऊन शेतकऱ्यांना पैसे देत आहे.
               झिरो बजेट वर खाते काढा असा शासन निर्णय असुनही येथील कर्मचारी आपला मनमानी कारभार चालुच ठेवलेला आहे. व शेतकर्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना विचारपुस केली असता त्यांच्या कडुन शेतकर्यांना उडवा उडवी चे ऊत्तरे देत आहेत.तुम्हाला कुठे तक्रार करायच आहे तीथे जाऊन करा अशा ऊद्धट भाषेने व्यवहार करत आहेत त्यामुळे शेतकर्यां मध्ये या कर्मचाऱ्यांच्या विरूद्ध तीव्र रोष पहायला मिळत आहे.
               येथील कर्मचाऱ्यांना राजकीय पुढाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचे ही ऐकायला मिळत आहे.शेतकर्यांनी बँकेतली स्लीप वर टाकलेल्या रक्कमेला काट छाट करून आपल्या हाताने पैशाच्या रक्कमा टाकुन निधी वाटप केला जात आहे.कित्येक वेळा शेतकऱ्यांनी निवेदन देऊन बर्याच शेतकऱ्यांनी शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार केली असता कुठलीही त्यावर कार्यवाही होत नासल्याने शेतकऱ्यांनी अता कोणाकडे दाद मागायची असे म्हणत आहेत व कापुण घेतलेल्या रक्कमेची पासबुक वरती ईंट्री असो अथवा नवीन पासबुक ची मागणी असो  दोन चार महिण्याने या  अशा शब्दांत सांगत आहे.
        अनेक वेळा या बँकेतील प्रकरण बर्याच वेळेस वर्तमान पत्रात येवुन देखील कोणती कार्यवाही होत नाही.अशा बँकेतील कर्मचाऱ्यांवर शासन व प्रशासनाने योग्य ती  कार्यवाही करेल का असा नाराजीचा सूर पसरलेला आहे.

लोकभारत न्युज चे प्रतिनिधी पवन कँदरकुंठे यांनी बँकेचे व्यवस्थापक देशमुख साहेब यांच्याशी चर्चा केली असता त्यांच्याकडुन कोणतीही प्रतिक्रिया देत नसल्याचे लक्षात आले