यंदा धनंजय मुंडे यांना गुलाल लागणार..! भाजपाची सीट धोक्यात ?

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

ज्ञानेश्वर डोईजड

              राज्यात सर्वाधिक चर्चेत्र असलेली परळी विधानसभा असुन या विधानसभेत मुंडे घराण्याचे वर्चस्व राहिलेले आहे. पण मागील दोन वेळेस निवडूण आलेल्या मंत्री पंकजाताई मुंडे यांना यावेळेस जोरदार धक्का बसण्याची शक्यता असुन यंदा धनंजय मुंडे यांना गुलाल लागणार असल्याचे चित्र परळी विधानसभेत दिसत आहे.

              राष्ट्रवादीकडुन धनंजय मुंडे यांनी परळीचा बालेकिल्ला सांभाळला असुन भाजपाकडुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, छत्रपती उदयनराजे भोसले, मंत्री राम शिंदे, महादेव जानकर, देविदास राठोड यांच्यासह अनेकांनी सभा घेतल्या व जोरदार फिल्डींग लावली पण जनतेत मात्र धनंजय मुंडे यांना वाढत्या प्रतिसादामुळे भाजपाची येथील सीट धोक्यात असल्यची चिन्हे दिसुन येत आहे.

मतदार संघात म्हणवी तशी विकास कामे झाली नसुन अनेकांची नाराजी पंकजा मुंडे यांच्यावर आहे आणि याचाच फायदा धनंजय मुंडे यांना होण्याची शक्यता दिसत आहे. भाजपाच्या अंतर्गंत सव्र्हेत सुध्दा परळी ची सीट धोक्यात असुन यामुळेच मातब्बर नेत्यांच्या सभाचा सपाटा येथे लागल्याची माहिती सुत्राकडुन मिळाली आहे.