भाजपाच्या अंतर्गंत सर्व्हेत मुखेडात कॉंग्रेस – भाजपाची अटीतटीची लढत

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

        मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

             महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेचा भाजपाच्या वतीने अंतर्गंत सव्र्हे केला असुन यात मुखेड – कंधार विधानसभेची सीट अटीतटीची असल्याची माहिती सुत्राकडुन मिळाली असुन यात महत्वाचा भाग म्हणजे जातीय समिकरण असुन जातीय समिकरण चालल्यास भाजपाला नुकसान तर कॉग्रेसला फायदा होण्याची शक्यता या सर्व्हेत केली गेली आहे.

             तालुक्यात मोठया प्रमाणात धनगर समाज, लिंगायत, मराठा, मुस्लीम, मागासवर्गीय , बंजारा समाज असुन यामुळे यातील बडया समाजाचा कल कॉग्रेसकडे असल्याचे या सव्र्हेत नमुद असल्याची माहिती आहे. पण जनता अजुनही तटस्थ दिसत असुन 24 तारखेला कोणाची हार तर कोणाच्या गळयात हार मतदार करतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.