मतदारसंघातील तरुणांंच्या पाठिंब्यासाठी उमेदवारांची धावपळ

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
ज्ञानेश्वर डोईजड 
           मुखेड – कंधार विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असून एक दिवस प्रचाराचा शिल्लक राहीला असून  परिणामी उमेदवारांनी गठ्ठा मतदान मिळण्यासाठी डावपेच सुरू केले आहेत. यात निर्णायक ठरणाऱ्या तरुण मंडळांच्या पाठिंब्यासाठी “लेटर पॅॅड” फार्मुल्यासाठी उमेदवारांची धावपळ होताना दिसून येत आहे. 

 

             युवकांना आपल्या पक्षाच्या बाजूने वळविण्यासाठी अनेक प्रकारच्या ऑफर  दिल्या जात  असून युवकांमध्येही “मिळतंय तर सोडायचं कशाला’ अशी परिस्थिती असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.