फडणवीस सरकार नसुन फसणवीसाचे सरकार  – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण ………. मंडलापुरकरांच्या विजयाची जबाबदारी माझी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 कॉंग्रेसला जनतेचा वाढता पाठींबा व प्रचंड जनसमुदाय भाजपसाठी धोकादायक

 ज्ञानेश्वर डोईजड

              शिवरायांचे नाव घेऊन भाजप सत्तेत आले पण प्रत्येकांना गाजर देण्याचे काम या सरकारने केले आहे. रोजगार, आरक्षण , शेतक­ऱ्यांंचा पिक विमा असो प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यावर, विविध समाजावर आरक्षणाचे गाजर दाखवुन या सरकारने अन्याय करण्याचे काम केले आहे. महाराजांच्या नावावर राजकारण करुन सत्तेत आले खरे पण त्यांची एक विट सुध्दा या सरकारने रचली नाही त्यामुळे सरकार फडणविसांचे नसुन फसणवीसांचे असून भाऊसाहेब मंडलापुरकर यांना विजयी करण्याची जबाबदारी माझी आहे असे मुखेड मतदारसंघातील कॉग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब पाटील मंडलापुर यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुखेड येथील दि. 17 रोजीच्या जाहीर सभेमध्ये बोलतना म्हणाले.

 

                    या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर, कॉग्रेस उमेदवार भाऊसाहेब मंडलापुरकर, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, कॉग्रेसचे जेष्ठ नेते शेषेराव चव्हाण, माजी जिप माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, पंचायत समिती सभापती अशोक पा रावीकर, अभंगराव गडदे, जिप सदस्य दशरथ लोहबंदे , व्यंकटराव दापकेकर, संतोष बोनलेवाड ,प्रकाश उलगुलवाड, स्वप्नील चव्हाण, सौ. शुभांगी सुगावकर, चंद्रकांत घाटे, ,सुभाष पाटील दापकेकर, राजन देशपांडे, शिवाजी पा बेळीकर, व्यंकटराव दबडे, प्रवक्ते दिलीप कोडगीरे, शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, डॉ श्रावण रॅपनवाड, शिवराज आवडके, विश्वांंभर पा मसलगेकर, डॉ. रामराव श्रीरामे अच्युत पा बेळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

                       अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले की, हटकर, धनगर समाज मागील अनेक वर्षापासुन नेतृत्वाच्या माध्यमातून उपेक्षीत होता पण यावेळेस कॉग्रेसपक्षाने संधी दिली असुन समाजासहीत सर्वांनी या संधीचे सोने करावे. कॉग्रेसचा उमेदवार तुमच्या आमच्या सारखा सामान्य उमेदवार असुन उमेदवाराचा विजय म्हणजे जनतेचा विजय आहे. तर कलम 370 मुदयावर भाजपावाले बोलतात पण कलम 371/2 या विषयी कोणीच बोलत नाहीत. लेंडी, रोजगार हे मुद्दे सर्वप्रथम मार्गी लावू तसेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम कॉग्रेसने याअगोदरही केले आहे आणि यापुढेही करणार असे म्हणाले.

……………………………………………………………………………………………………….               
          ही निवडणूक ईतिहासात नोंद होणारी असुन जनशक्ती विरोधात धनशक्ती आहे. पैशाच्या जोरावर समाजात राठोडने हुकुमशाही केली असुन जनता त्यांना मतदाना रुपात चांगलाच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही तर विरोधक अशोकराव चव्हाण साहेबांच्या जीवावर मोठे झाले आहेत. समोर 12 पक्ष बदलेला उमेदवार असुन मी एक सर्व सामान्यातला उमेदवार आहे व कॉग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे असे कॉग्रेस उमेदवार भाऊसाहेब मंडलापुर म्हणाले. 
…………………………………….……………………………………………………………………..

         कुठं हाय कुत्रंं – नाव न घेता चिखलीकरावर अशोकरावांचा टोमणा

            लोकसभेत याला ना त्याला घाल…… अशी म्हण देत कुठं हाय कुत्रंं असा टोमणा अशोकराव चव्हाण यांनी खा. चिखलीकरांना लगावला. 

………………………………………………………………………………………………………….

लाल,पिवळा,निळा,भगवा, हिरवा व पट्टा ; राठोडला निवडणूकीत दया रट्टा – बेटमोगरेकर

                सर्व समाजातील कार्यकर्ते, पदाधिकारी विद्यमान आमदराविषयी नाराज असुन आता एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे लाल,पिवळा,निळा,भगवा, हिरवा व पट्टा ; राठोडला निवडणूकीत दया रट्टा अशी चारोळी ठोकत माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी चिमटा घेतला.

………………………………………………………………………………………………………

 मुस्लीम विचार परिवर्तन मंच, भोई समाज, मातंग समाज, मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिागेड, यशवंत सेना, कोळी समाज,टि.आर.एस या प्रमुख  संघटनेच्या पदाधिकारी यांनी भाऊसाहेब मंडलापुरकर यांना पाठींबा दिला. 

……………………………………………………………………………………………………

माझा राजीनामा खिशात – सभापती रावीकर

              मी पंचायत समितीमध्ये भाजपाचा सभापती म्हणुन असलो तरी माझा राजीनामा खिशात असुन माझ्या समाजासाठी माझे सर्वस्व कधीही अर्पण करायला तयार आहे असे सभापती अशोक पाटील रावीकर म्हणाले. 

  ……………………………………………………………………………………………………

कॉग्रेस उमेदवारास वाढता पाठींबा

              कॉग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब पाटील मंडलापुर यांना मतदार संघात वाढता पाठींबा दिसत असल्याचे चित्र असुन भाजपाच्या दोन्ही सभेपेक्षा अशोकराव चव्हाण यांची सभा दुप्पट मोठी झाल्याचे दिसत आहे. तर भाजपाच्या उमेदवारावर मतदार संघात तिव्र नाराजी असुन याचाच फटका विधानसभा निवडणूकीत बसण्याची दाट शक्यता आहे.
मुखेड – कंधार मतदार संघात चार जिप सदस्य कॉग्रेसचे असुन भाजपचे तीन तर शिवसेना एक व अपक्ष एक असे समिकरण असुन सध्या ग्रामीण भागासह शहरात कॉग्रेसचे पारडे जड दिसत आहे त्यामुळे भाजपाला धोक्याची घंटा असल्यामुळे भाजपा गटात खळबळ माजली आहे.

  ……………………………………………………………………………………………………

भाजपच्या दोन सभेपेक्षा कॉंग्रेसच्या सभेला दुप्पट गर्दी

           मुखेड येथील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे व मुख्यमंत्री यांच्या सभा झाल्या त्या सभा पाहता कॉंग्रेस पक्षाच्या या सभेला दुप्पट गर्दी असल्याचे दिसून आले. अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व जनता सुद्धा भाजपवर नाराज असल्याचे दिसून आले त्यामुळे याचा थेट फायदा कॉंग्रेसचे उमेदवार मंडलापुरकर यांना होताना दिसत आहे. 

  ……………………………………………………………………………………………………  
 
            यावेळी सभेस जे टी भंगारे,  डॉ. रंजीत काळे, उत्तमअण्णा चौधरी, राजु पा रावणगावकर, शौकतखाँ पठाण, नगरसेवक शाम एमेकर, मैनोदीन शेख, डॉ. पांडुरंग श्रीरामे, बस्वराज स्वामी, बालाजी पाडांगळे, बाबुराव गिरे, गोविंद डुमणे, शौकत होनवडजकर, राम पाटील, शिवाजी गेडेवाड, दिगांबर पाटील गोजेगावकर, किरण पाटील बोडके, शादुल होनवडजकर, डॉ. जीवण वडेर, शंकर पवार, रामेश्वर इंगोले,रमेश बर्दापुरे, नागनाथ पाटील बेळीकर, सादक तांबोळी, संजय यरपुरवाड, सुर्यकांत पाचाळ, माधव देवकत्ते, बालाजी पा ढोसणे, कल्याण श्रीरामे, फेरोज सौदागर, जयवंत तरंगे, मारोती घाटे, संदिप बावलगांवकर, दिनेश पाटील केरुरकर यांच्यासह अनेकांची होेती तर मुखेड पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त होता. या सभेचे डॉ श्रावन रॅपणवाड यांनी सूत्रसंचालन केले तर आभार किरण पा बोडके यांनी मांडले