मराठवाडयाच्या या पिढीने दुष्काळ पाहिला ; दुस­ऱ्या पिढीला पाहु देणार नाही  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा राजकारण
 ज्ञानेश्वर डोईजड
                पाच वर्षाच्या लहाण मुलास विचारा कोणाचे सरकार येणार तो म्हणेल महायुतीचेच येणार. विरोधकाकडे नेतृत्व नसुन काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूका सोडुन बँकॉकला पळुन जातात. मोदीजींच्या नेतृत्वात देश मजबुत स्थितीकडे जात असुन मराठवाडयाच्या या पिढीने दुष्काळ पाहिला तर दुस­ऱ्या पिढीला पाहु देणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मुखेड मतदारसंघातील भाजपा – सेना महायुतीचे उमेदवार डॉ. तुषार राठोड यांच्या प्रचारार्थ मुखेड येथील जाहीर सभेमध्ये दि १६ रोजी बोलातना म्हणाले.
                  या कार्यक्रमास कर्नाटक राज्याचे पशुसंवर्धन मंत्री प्रभु चव्हाण,खासदार प्रताप पाटील चिखलीकर,माजी आ. गोविंदराव केंद्रे ,माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड , माजी आ. अविनाश घाटे ,माजी आमदार ओमप्रकाश पोखर्णा,जिल्हा सरचिटणीस माधवांना साठे ,डॉ. आजित गोपछडे ,चैतन्यबापु देशमुख, व्यंकटराव पाटील गोरेगावकर ,श्रीराम पाटील राजूरकर, सभापती खुशाल पाटील ऊमरदरीकर ,बळवंत पाटील बेटमोगरेकर, बालाजी पाटील आंबुलगेकर,  गौतम काळे,शिवसेनेचे वसंत संबुटवाड, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील जाहुरकर, जिप सदस्य संतोष राठोड, बाळासाहेब गोमारे, अशोक गजलवाड,नागनाथ लोखंडे, गटनेते चंद्रकांत गरुडकर, भालचंद्र नाईक, पंजाबराव वडजे,देविदास सुडके यांची प्रमुख उपस्थिती.
                तालुक्यातील आंतरराज्य लेंडी प्रकल्पाचे प्रलंबित काम सरकार आल्यानंतर एक वर्षाच्या आत पुर्ण करु, मराठवाडयातील प्रत्येक गावात शुध्द फिल्टर पाणी देऊ, कोकणातील पाणी मराठवाडया आणू, पिक विमा देऊ , 1 कोटी रोजगार देऊ, लिंगायत समाजाच्या पोट जातीसाठी प्रमाणपत्र देण्याचे काम अंतीम टप्यात असुन लवकरच ते पुर्ण करु, ओबीसी मंत्रालय आजपर्यंत 300 कोटी बजेट दिले असुन 3 लाख नागरीकांचे अतिक्रमीत घरे नियमीत केले आहेत तर पाच वर्षात 60 लाख घरे दिली असुन 10 लाख घरे पुर्णत्वास आहेत. मोदीजींनी देशात 370 कलम रद्द करुन डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे संविधान कश्मीर मध्ये सुध्दा लागू करुन डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न पुर्ण केले असुन कश्मीरमध्ये तिरंगा डौलाने फडकत आहे. राज्यात मजबूत सरकार आणण्यासाठी महायुतीच्या उमेदवारास जिंकुन विधानसभेत पाठवा असेहीे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
                आ. डॉ. राठोड म्हणाले की, कॉग्रेसचा उमेदवार  मनरेगाचा गुन्हेगार असून अशा उमेदवारास कॉग्रेसने ऐनवेळी जातीय समीकरण समोर ठेऊन तिकीट दिले आहे. मतदार संघात रस्त्यांच्या माध्यमातून अनुशेष भरुन काढण्याचे काम असे म्हणाले तर पिक विमा, लेंडी, डॉ. बाबासाहेब स्मारक जागा, छत्रपती शिवाजी महाराज वाढीव जागा अशा अनेक मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर डॉ राठोड यांनी उपस्थित केले.  

           तर खा.चिखलीकर म्हणाले की, अशोकराव लोकसभेत कोणताही प्रश्न उपस्थित केला नसुन जांभळी देण्यास ते लोकसभेत तोंड उघडत नाहीत अशी बोचरी टिका सुध्दा केली. या सभेस भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील हजारो नागरीक उपस्थित होते. मुखेड पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कै. आ. गोविंदराव राठोड यांचा विसर….
          आ.डॉ राठोड यांना त्यांचे वडील कै गोविंदराव राठोड याच्या निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळाली पण आजच्या त्यांच्या भाषणात कुठेही त्यांचा उल्लेख दिसला नाही तर मागील स्टेज वरील बॅनरमध्ये ही त्यांचा फोटो दिसून आला नाही . जनतेत मात्र याबाबत उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत होती. 

अशोक चव्हाण यांच्यासभेकडे लक्ष…!
          कॉंग्रेस व आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब मंडलापुरकर यांच्या प्रचारार्थ  अशोक चव्हाण यांची  दि १७ रोजी मुखेड येथे सभा असून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे  देवेंद्र फडणवीस यांना काय उत्तर देतील व कोणते मुद्दे उपस्थित करतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.