यशवंत नगर येथे विविध कार्यक्रमांचे माध्‍यमातून महिला मतदार जनजागृती

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघचे स्विप कक्षाचा उपक्रम

          नांदेड : वैजनाथ स्वामी
         86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक 2019 करिता महिला मतदारांची मतदान टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी स्‍वीप कक्षाचे माध्‍यमातून दिनांक 13 ऑक्‍टोबर 2019 रोजी यशवंतनगर येथे महिला मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्‍यात आला. या कार्यक्रमांतर्गत उ?पस्‍थीत महिलांनी मतदान जनजागृती संबंधी भारूड, गीत, इ. सादर केले. त्‍यामध्‍ये डॉ.उज्‍वला सदावर्ते व सहका-यांनी सादर केलेल्‍या मतदान जनजागृती नाटीकेस मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच सर्व उपस्थित महिलांनी प्रलोभनांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्‍याची शपथ घेतली व मतदान जनजागृती संदेशपर पत्रक वितरीत केले.
                 यानंतर सर्व सहभागी महिलांनी परिसरात मतदार जनजागृती रॅली काढली. या कार्यक्रमात महिलांनी स्‍वयं स्‍फुर्तीने सहभाग घेतला. सदर कार्यक्रमास यशस्‍वी करण्‍यासाठी श्रीमती कविता जोशी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे नियेाजन 86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघ स्विप कक्षातील रुस्‍तुम आडे, गणेश रायेवार, प्रसाद शिरपूरकर, श्री वाकोडे यांनी केले.