फार्मसी कॉलेज, श्यामनगर येथील युवा मतदारांनी घेतली मतदार जनजागृती मतदानाची प्रतिज्ञा

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या
          नांदेड : वैजनाथ स्वामी
                   विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत युवा मतदारांचा सहभाग वाढविण्‍यासाठी 86  नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्‍वीप कक्षाचे माध्‍यमातून दिनांक 14 ऑक्‍टोबर 2019 रोजी फार्मसी कॉलेज, बाबानगर, नांदेड येथे युवा मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्‍यात आला. या कार्यक्रमांस फार्मसी कॉलेजमध्‍ये पदवी व पदविका अभ्‍यासक्रम शिकणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी युवा मतदार मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
                       तसेच प्राचार्य डॉ.जी.आर.शेंदारकर, प्राचार्य डॉ.घेवारे व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. या प्रसंगी युवा मतदारांचा मतदान सहभाग व त्‍याचे महत्‍व श्री प्रसाद शिरपूरकर यांनी सांगीतले. यांनतर सर्व उ?पस्‍थीतांना मतदान करण्‍याची प्रतिज्ञा श्रीमती कविता जोशी यांनी दिली. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यावेळी मतदान करण्याचे व मतदार जागृती करण्‍याचा मानस कार्यक्रमानंतर बोलून दाखवला.
                  सदर कार्यक्रमास यशस्‍वी करण्‍यासाठी कार्यक्रमाचे नियेाजन स्विप कक्षातील रुस्‍तुम आडे, श्रीमती अनघा जोशी, गणेश रायेवार, संजय वाकोडे, यांनी केले.