आष्टीकर यांची प्रचार यंत्रणेत आघाडी ! अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

नांदेड जिल्हा हदगाव
देवानंद हुंडेकर 
            हदगाव : 84 हदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर विश्वास टाकून मनाठा,हिमायतनगर ,तामसा,तळणी आदी सर्कलमधील अनेक सर्वसामान्य नागरिक शिवसेनेत प्रवेश करीत असल्यामुळे   आष्टीकर यांची प्रचार यंत्रणेत आघाडी  घेतल्याचे चित्र मतदार संघात दिसत आहे.
             यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून  मनाठा सर्कल मधील उंचाडा, मनाठा, सावरगाव,नेवरी , नेवरवाडी, करमोडी, तालंग,आदीसह हिमायतनगर तालुक्यील शेकडो युवा वर्गासह जेष्ट नागरिक सुध्दा जाहीर प्रवेश करित असल्याचे दिसून येत आहे.
               अनेक गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करीत असल्यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धडकी भरल्याचे दिसून येत असून जसे जसे मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसतसा निवडणुकीच्या प्रचारामध्ये रंगत येत आहे.शिवसेनिकानी आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
             सध्या तरी हदगाव विधानसभा मतदार संघात शिवसेना भाजपा युवतीच्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत असल्याचे राजकिय जाणकार बोलत असल्याचे दिसून येत असले तरी आष्टीकर यांच्या विरोधकांनी त्यांना पराजित करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावल्याचे ही दिसत आहे. शेवटी कोणाची हार तर कोणाच्या गळ्यात हार हे मतदार ठरवणार हे ही तितकेच खरे … !