प्रचारातुन रोजगार, स्थलांतर, आरोग्य, लेंडी मुख्य मुद्दे सोडून ; मुखेड – कंधार मतदार संघाची निवडणूक

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
ज्ञानेश्वर डोईजड
                        मुखेड कंधार मतदार संघात भाजपा – कॉग्रेस , वंचित बहुजन आघाडी , संभाजी ब्रिगेडचे प्रचाराचा जोर धरला असुन या निवडणूकीत मुखेड – कंधार मतदार संघातील महत्वाचे मुद्दे रोजगार, स्थलांतर, आरोग्य, लेंडी मुख्य मुद्दे सोडून निवडणूक होत असल्याची चर्चा मतदारातून ऐकायला मिळत आहे.

                    तालुक्यातुन हजारो नागरीक दरवर्षी स्थलांतर होत असतात यात प्रामुख्याने वाडी तांडयावरील जनता असते . आई वडीलांना घरी सोडून सहा महिण्याच्या कामासाठी प्रति कोयता 50 ते 60 हजार मिळतो पण नाईलाजास्तव नागरीकांना तालुक्यातून रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत असुन लेंडी प्रकल्प आजतागयात भिजत घोंगडे बनले असुन प्रत्येक राजकारणी लोकांनी याला राजकारणाचा मुद्दा बनवुन मतपेटी वाढविण्याचा प्रयत्न केला तर तालुक्यात आरोग्याची सुविधा म्हणवी तेवढी चांगली नसुन उपजिल्हा रुग्णालय असुन वळंबा नसुन खोळंबा असल्याची गत आहे. ग्रामीण भागात सुध्दा आरोग्याची ऐसीतशी झाल्यामुळे नागरीकांना थेट नांदेड गाठावे लागत असते.

                      अनेक युवक शिक्षण शिकुन सुध्दा नोकरी लागत नाही त्यामुळे तालुक्यात रोजगाराची संख्या सुध्दा वाढत असुन छोटे मोठे उद्योग टाकुनही चालत नसल्याने अनेकांना उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे या निवडणूकीत  नागरीकांच्या भौतिक सुविधेचे मुद्दे बाजुला ठेवून भलतेच मुदयावर प्रचार करताना सर्व राजकरणी दिसत आहे.