गोरठेकरांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्याची सभा

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा भोकर

 

नादेड : वैजनाथ स्वामी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोकर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीनिवास उर्फ बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या प्रचारार्थ आज सोमवार दि. 14 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता चमन मैदान बारड येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुक प्रचाराची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रचार सभेसाठी भोकर मतदारसंघास पहिली पसंती दिल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पहिली व एकमेव मुख्यमंत्र्यांची सभा आज सोमवार दि. 14 ऑक्टोबर रोजी बारड येथे होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या प्रचार सभेस नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. राम पाटील रातोळीकर, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, हिंगोलीचे शिवसेना खा.हेमंत पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद बोंढारकर, नागनाथ घिसेवाड, राम चौधरी, देविदास राठोड, धर्मराज देशमुख, राजे पळसीकर, शिवसेनेचे जि.प.सदस्य बबनराव बारसे, शिवसेनेचे बाळासाहेब देशमुख बारडकर, भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य चैतन्यबापू देशमुख, भाजपाचे सरचिटणीस गंगाधर जोशी, प्रविण साले, जि.प.सदस्या प्रणिता देवरे आदिंची उपस्थिती लाभणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश मागण्यासाठी गत महिण्यात नांदेड येथे महाजनादेश यात्रा घेऊन आले होते. या दरम्यान त्यांनी नांदेड जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला बनावा अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर नांदेडचे नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्हा भाजपमय करण्यासाठी सरसावले आहेत. मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून भाजपात प्रवेश केलेल्या बापुसाहेब गोरठेकर यांना मुख्यमंत्र्यांनी भाजपा-शिवसेना महायुतीचे निष्कलंक उमेदवार म्हणुन भोकर विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी दिलीआहे.मुख्यमंत्र्यांनी भोकर विधानसभेला लक्ष्य करुन भाजपा पक्षाची पुर्ण ताकद गोरठेकर यांच्या पाठिशी उभी केली आहे. गोरठेकर यांच्या प्रचारासाठी भोकर मतदारसंघाची निवड करुन जिल्ह्यातील पहिली सभा भोकर मतदार संघातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बारड या शहराची सभेसाठी निवड केल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासमोर भाजपाचे तगडे आव्हान उभे करण्यात आल्यामुळे नांदेड लोकसभेतील पराभवाची पुनरावृत्ती भोकर विधानसभेच्या निवडणूकीत होण्याची चिन्हे दिसत आहेत.