सतिश लासुणे व सौ सुलोचना वाघमारे यांचा निरोप समारंभ

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / प्रतिनिधी
             मुखेड तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा हसनाळ प.दे केंद्र येथील सतिश लासुणे व सौ सुलोचना वाघमारे  यांचा निरोप समारंभ डी ११ रोजी आयोजित करण्यात आला
           या कार्यक्रमास  अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख व्यंकटराव माकणे ,  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव नाईक, राजू पाटील सुरनर,बालाजी नरबागे, निळकंठ पाटील,मारोती करदाळे , मारोती गदले यांची उपस्थिती होती.
यावेळी  प्रास्ताविक सचिन रामदिनवार ( मुअ ) यांनी केले तर  सतिश लासुणे सर व सौ सुलोचना वाघमारे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सतिश लासुणे यांनी शाळेस पंखा भेट दिला.
          शिक्षक व गावकऱ्यांच्या समन्वयाने शाळेचा विकास साधवा असे श्री माकणे साहेब यांनी मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  लक्ष्मण मानसपुरे यांनी केले व सौ अनुराधा खांडेकर यांनी आभार मानले..