मुखेड – कंधार मतदार संघात जातीय समिकरणाचा बोलबाला  जातीय समिकरण जुळल्यास भाजपाला अवघड तर कॉग्रेसला सुखकर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
ज्ञानेश्वर डोईजड

 

                मुखेड – कंधार विधानसभा मतदार संघात कधी नव्हे एवढा जातीय समिकरणाचा बोलबोला दिसत असुन या जातीय समिकरणात अनेक भावी आमदारांचा जीव टांगणीला असल्याचे दिसत आहे.
मतदार संघात धनगर समाजाचे प्राबल्य जास्त असुन जवळपास 70 हजार मतदार धनगर समाजाचा असुन त्यापाठोपापाळ लिंगायत समाजाचे 60 हजार मतदार आहेत तर तिस­ऱ्या क्रमांकावर मराठा समाज असुन त्यांचे अंदाजे जवळपास 50 हजार मतदारांची संख्या आहे. तर मागासवर्गीय समाज सुध्दा अंदाजे 35 हजाराच्या जवळपास असुन अल्पसंख्याक मतदार 20 ते 25 हजार आहेत. तर बंजारा समाजाची मते 15 ते 20 हजाराच्या जवळपास असून अनेक समाजाची मते ३ ते ४ हजार तर काहीची हजारांच्या जवळपास आहेत.
                 माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी राजकीय समिकरण न पाहता यावेळेस सामाजिक समिकरण पाहुन कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मंडलापुरकर यांना उमेदवारी दिली तर भाजपाकडुन पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा डॉ. राठोड यांना उमेदवारी दिली. दोन्ही पक्षांची उमेदवारी घोषित होताच मतदारांसहीत नागरीकांनी सुध्दा जातीय समिकरणाची चर्चा करत भाऊसाहेब मंडलापुरकर पारडे जड असल्याचे समिकरण चालु केले तर डॉ. राठोड यांचा मतदार संघात जनसंपर्क असल्याने ही लढाई आता अटीतटीची होणार असल्याचे दिसत आहे.

 

                 लोकसभेला मतदारसंघात कॉग्रेसला कमी मतदानावर समाधान मानावे लागले होते. पण सध्याचे समिकरण पाहता तालुक्यात जवळपास 50 ग्राम पंचायतीच्या वर धनगर समाजाचे वर्चस्व असुन त्यापाठोपाठ मराठा व लिंगायत समाज आहे. तर तालुक्यात वाडी तांडयांची सुंख्या जास्त असल्याने बंजारा समाजाचे सुध्दा बहुतांश वर्चस्व आहे.

 

                    निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडी, बसपा, संभाजी ब्रिागेड यांच्यासह भाजपा व कॉग्रेसचे उमेदवार निवडणुक रिंगनात आहेत. मुख्य लढत भाजपा – व कॉग्रेसमध्ये होणार असल्याचे चित्र मतदार संघात आहे. जातीय समिकरण पाहता मंडलापुरकर यांचे पारडे सध्या डॉ. राठोड यांच्यापेक्षा जड असल्याचे दिसत असुन मागील नगर पालिका मध्ये गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असुन डॉ. राठोड यांना नपा मध्ये निष्ठावंताना दुर केल्याने त्यांच्या बंधुच्या रुपाने पराभव स्विकारावा लागला होता विधानसभा निवडणूकीत काय होणार ? असा प्रश्न मतदारसंघात मतदारांना पडलेला आहे. तर प्रचाराला दहा दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांनी गावभेटीवर भर दिल्याचे दिसते.