श्रीक्षेत्र केदारनाथ देवस्थान येथे वानखेडे यांच्या हस्ते नारळ फोडून जवळगावकर यांच्या प्रचाराला सुरुवात

नांदेड जिल्हा हदगाव
देवानंद हुंडेकर
                हदगाव-हिमायतनगर विधानसभा- मतदार संघ श्रीक्षेत्र केदारनाथ देवस्थान  येथे सुभाषरावजी वानखेडे यांच्या हस्ते नारळ फोडून माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली .
             63 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त विजयादशमी निमित्त माधव पाटील जळगावकर यांनी शुभेच्छा दिल्या व आज पासून भोलेनाथ त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराला सुरुवात करतो व कार्यकर्त्यांना व जनतेच्या आशीर्वादामुळे मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आपला विजय निश्चित आहे असे माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले

 

           यावेळी काँग्रेसचे गोपाल भाऊ पवार सर्व महाआघाडीच्या  कार्यकर्त्याना  काँग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस,(PRPI कवाडे गट ), शेकाप ,स्वाभीमानी शेतकरी संघटना ,व मित्र पक्षाच्या महाआघाडी चे अधिकृत उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर  यांच्या प्रचार शुभारंभ सोहळ्याचे नारळ फोडण्यात आला.
                मतदार संघातील सर्व आजी माजी पदाधिकारी,कार्यकर्ते, आजी-माजी जि .प .सदस्य ,प .स सदस्य ,नगरसेवक व  कृ .उ .बा समिती सदस्य व  मार्केट कमिटी सदस्य, प्रत्येक गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस ,युवक काँग्रेस व मित्र पक्ष व सर्व युवक कार्यकर्ता उपस्थित होते.