उमेदवाराच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा सोशल मिडियावर जोर वाढला…

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
संदिप पिल्लेवाड
                       मुखेड कंधार विधानसभेसाठी पाच उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरल्यानंतर उमेदवार गावभेटी कार्यक्रमात व्यस्त झाले असुन कार्यकर्ते आप आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा सोशल मिडियावर जोर वाढल्याचे चित्र मतदार संघात दिसत आहे.

 

              तालुक्यात पाच उमेदवार रिंगणात असून काही उमेदवारांनी नराश्याम महाराज मठात प्रचाराचा नारळ फोडुन तर काहींनी मष्णेर येथे प्रचाराचा नारळ फोडुन गावभेटी कार्यक्रम सुरु केले असुन कार्यकर्ते मात्र सोशल मिडीयावर जोमात दिसत आहेत.

 

                   मुखेड कंधार विधानसभेत पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी येथे लढत मात्र  भाजपा आणि काँग्रेस यांच्यात दुरंगी असल्याचे पहावयास मिळत आहे. उमेदवार आपआपल्या प्रचारार्थ गावभेटी कार्यक्रमात व्यस्त असल्याने कार्यकर्ते त्याच कार्यक्रमाच्या फोटा सोशल मिडीयावर व्हायरल करून आपलाच उमेदवार सर्वश्रेष्ठ असल्याचे दाखवून देत आहे.