काँग्रेसच्या भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर यांच्या प्रचाराचा नारळ मशनेर येथे फुटला….मंडलापूरकर यांना मतदारसंघात वाढता प्रतिसाद..!

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
दत्ता पाटील माळेगावे
             मुक्रमाबाद : धनगर व हटकर समाजाचे आराध्य दैवत मष्णैर देवालयाचे आज मंगळवारी दर्शन घेऊन काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर यांनी प्रचाराचा नारळ फोडून सुरु केला यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षाच्या प्रतिक्षे नतंर २०१९ च्या होऊ घातलेल्या मुखेड विधान सभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तालुक्यातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यक्रता म्हणून ख्याती असलेले भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर यांना उमेदवारी देऊन भाजपाचे उमेदवार तुषार राठोड यांच्या विरोधात रिगंणात उभे केले आहे.कारण मुखेड तालुक्यात हटकर – धनगर हा समाज नंबर एक वर असल्यामुळे याचा फायदा मंडलापुरकर यांना नक्कीच होणार यामुळे तालुक्यातील समाज एकवटला आहे.
याबरोबर तालुक्यातील मराठा, लिंगायत,मुस्लीमासह आदी समाज बांधवाचा बिनशर्त पांठीबा मिळणार असल्याचे खात्री पुर्वक बोलले जात आहे.भाजपाचे माजी आमदार डॉ.तुषार राठोड यांनी साडेचार वर्षात तालुक्यात म्हणावा तेवढे विकासाचे कामे करु शकले नाहीत.जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे लेंडी धरणाच्या बुडीतक्षेत्रातील मुक्रमाबाद येथील संपादित १३१० घरांचा मावेजा संर्दभात राठोड यांनी पोकळ आश्वासन देऊन धरणग्रस्तांना खिळवून ठेवले व इतर आकरा बादीत गावातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबीत प्रश्ने मार्गी लावण्यासाठी राठोड अपयशी ठरले.
यामुळे भाजपाचे उमेदवार तुषार राठोड यांच्या विषयी प्रकल्पग्रस्तां मध्ये तीव्र नाराजी असल्यामुळे याचा फटका होणाऱ्या विधान सभा निवडणुकात तुषार राठोड यांना बसणार आहे.याबरोबर लेंडी नदीच्या मुक्रमाबाद सह परिसरातील गावात आमदार तुषार राठोड यांच्या दुर्लक्षामुळे म्हणावा तेवढा विकास झाला नाही.यामुळे प्रत्येक गावातुन मतदार बांधवाचा कल काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर यांच्या बाजुने असल्याचे दिसुन येत आहे.

यामुळे माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमुगरेकर,दिलीप पाटील बेटमुगरेकर,सभापती अशोक पाटील रावीकर यांच्या नेतृत्वाखाली भाऊसाहेब पा.मंडलापुरकर यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी व्यकंटराव दबडे,डॉ.रामराव श्रीरामे,प्रकाश कुंडगीरे,बाबु नाईक,बाबु पा.कुंद्राळकर,दत्ता पाटील,विठ्ठल नाईक,मष्णाजी बाजगीरे,नारायण पाटील,हाणमंत सादणे,सह तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,आदी समाज बांधवानी कमर कसली आहे.