डॉ. राठोड यांची अस्तित्वाची लढाई तर मंडलापुरकर घडविणार का क्रांती ? मुखेड – कंधार विधानसभेसाठी 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगनात तर 4 उमेदवारांची माघार 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड – कंधार विधानसभा उमेदवारी माघार घेण्याची दि. 07 रोजीच्या दिवशी चार अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घतले तर पाच पक्षीय उमेदवार निवडणूक लढवित असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी शक्ती कदम व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी माहिती दिली.

माघार घेतलेले उमेदवार – रफिक खाजामियाँ अहमद, पंजाबराव श्रीहरी वडजे, लक्ष्मण उध्दव गोमारे, रविंद्र जगन सोनकांबळे या उमेदवारांचा समावेश आहे तर निवडणूकीच्या रिंगनात कॉग्रेसचे भाऊसाहेब खुशालराव पाटील, भाजपाचे डॉ. तुषार गोविंदराव राठोड, वंचित बहुजन आघाडीचे जीवण विठठलराव दरेगावे, संभाजी ब्रिगेडचे बालाजी जनार्धन आगलावे तर बसपाचे जितेंद्र दशरथ वाघमारे हे आहेत.

मुखेड – कंधार विधानसभेमध्ये पाच उमेदवार निवडणूक रिंगनात असल्याने चित्र स्पष्ट होत असुन प्रमुख लढत भाजपा – कॉग्रेसमध्ये होणार असुन इतर उमेदवरांचे जातीय समिकरण पाहता त्यांना सुध्दा कमी लेखता येणार नसल्याचे चित्र मतदार संघात आहे.

या निवडणूकीत जातीय समिकरण चालणाराचा बोलबोला असुन जातीय समिकरण चालल्यास डॉ. राठोड यांना अवघड तर मंडलापुरकर यांना सोईस्कर असल्याचे मतदार संघात मतदारांतून चर्चा व्यक्त केली जात आहे.

छाननी अखेर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने आज पासुन निवडणुक प्रचाराचा धुराळा उडणार असुन यामध्ये उमेदवारांची सत्वपरिक्षेचा कस लागणार आहे. यात भाजपाचे डॉ. तुषार राठोड यांची अस्तित्व टिकविण्यासाठी लढाई तर कॉग्रेसचे भाऊसाहेब मंडलापुर मुखेड – कंधार मतदार संघात डॉ. राठोड यांचा पराजय करुन क्रांती घडविणार का असा सवाल जनमानसात ऐकायला मिळत आहे. हे सर्व असुनही मतदार कोणाच्या पारडयात आपले मत देतील यावरही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.