अन त्या चिल्लर आनलेल्या उमेदवारालाच फुटला घाम, उमेदवारी अवैध      मुखेड – कंधार मतदारसंघात बारा पैकी  नऊ अर्ज वैध तर तीन अवैध 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
 ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड – कंधार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना डिपॉझिट म्हणुन पोत्यात 10 हजार रुपयाची चिल्लर अपक्ष उमेदवार संभाजी लवटे यांनी आणुन रक्कम मोजण्यासाठी प्रशासनाला घाम फोडण्याचा प्रयत्न केला  पण दि. 05 रोजी छानणी दरम्यान या उमेदवाराचा निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांनी उमेदवारी अर्ज अवैध ठरवला.

उमेदवाराने प्रशासनाची दमछाक करण्याची तयारी अगोदर पासुनच करण्याचे ठरवले अन एक एक रुपया गोळा केला. प्रशासनास वेठीस धरुन त्यांना रक्कम मोजाय लावायचीच असा ठाम निश्चय केलेल्या उमेदवाराने याबाबत काळजी घेतली खरी पण उमेदवारी अर्ज भरताना जी काळजी घ्यावयाची होती ती काळजी आपल्या उमेदवारी शपथपत्रात घेतली नसल्यामुळे हा अर्ज अवैध ठरला.

प्रशासनाकडुन उमेदवारी अर्ज भरताना दिल्या गेलेल्या सुचना पालन न करता छाननी प्रक्रिये दरम्यान त्रुटी पुर्तता करणे आवश्यक असताना सदर उमेदवार उशीराने निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांच्याकडे धाव घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला पण परिणामी आपल्या अर्जात बँकेची अपुर्ण माहिती व शपथपत्र अपुर्ण भरल्याने अर्ज अवैध होताच उमेदवार संभाजी लवटे यांनाच घाम फुटला.

छाननी दरम्यान निवडणुक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 उमेदवारांनी 15 उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यापैीि 09 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध तर 03 उमेदवरांचे अर्ज अवैध झाले असल्याची माहिती दिली.
…………………………………………………..

अवैध अर्जामध्ये अनिल सिरसे, संभाजी लवटे, शंकर घोडके या तीन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. तर डॉ. तुषार गोविंदराव राठोड, भाऊसाहेब खुशालराव पाटील, जीवण विठठलराव दरेगावे, बालाजी जनार्धन आगलावे, जितेंद्र दशरथ वाघमारे,रफिक खाजामियाँ अहमद, पंजाबराव श्रीहरी वडजे, लक्ष्मण उध्दव गोमारे, रविंद्र जगन सोनकांबळे या उमेदवारांचा अर्ज वैध झाला आहे.