हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघात ४१उमेदवारी अर्ज दाखल तर मी बाबुराव या नावाच्या टोपी शहरभर दनदनावली 

नांदेड जिल्हा हदगाव

 

हिमायतनगर:

८४ विधानसभा मतदार संघात एकुन 88अर्ज गेले असून त्यापैकी ४१ उमेदवारांनी आपले आर्ज दाखल केले आसल्याची माहीती ८४ निवडणुक विभागा अंतर्गत मिळाली असून शेवटच्या दिवशी एकुण ३२ अर्ज दाखल झाले असल्याचे दिसून येते तर दिनांक ३ आॅक्टोबर पर्यत ९ अर्ज दाखल करण्यात दाखल करण्यात आले होते आज रोजी  एकुण ४१ अर्ज दाखल झाले आहेत.

दिनांक ४ आॅक्टोबर रोजी म्हणजे शेवटच्या दिवसी एकुण ३२ उमेदवारांनी अर्ज दाखल  केले आसुन हदगाव-हिमायतनगर विधान सभेसाठी शेवटच्या दिवसी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी शक्ती प्रदर्शन करीत काॅग्रेस पक्षा कडून आपली उमेदवारी दाखल केली.

तसेच हदगाव विधानसभेत सर्वाधिक आकर्षक ठरलेले शिवसेनेचे बंडखोर व अपक्ष उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी भरून उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचा चहाता वर्ग अर्ज भरतांना मोठ्या प्रमाणात होता.तर  मी बाबुराव या नावाच्या टोपीने सर्व हदगाव शहर दणाणून गेल्याचे दिसून आले तर जिकडे पाहावे तिकडे मी बाबुराव या  नावाची  टोपी परिधान केलेले तरुण मंडळी व नागरीक दिसुन येत होते.अश्या प्रकारे

एकुण ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.त्यामध्ये शिवसेनेकडुन विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर,काॅग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर,वंचित बहुजन आघाडीचे डाॅ.सुदर्शन भारती,अपक्ष उमेदवार बाबुराव कोहळीकर,अपक्ष उमेदवार म्हणुन गंगाधरराव पाटील चाभरेकर,बाबुराव पाटील पाथरडकर,जाकेर चाऊस,रामचंद्र राठोड,बालाजी वाघमारे  तामसेकर,गंगाबाई पाणसरे,गोविंदराव तिव्हाळे,अॅड.मारोतराव पाटील,शेख अहमद व इतरानी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले