मुखेड – कंधार विधानसभेसाठी 12 उमेदवाराने भरले 15 उमेदवारी अर्ज        भाजप – कॉंग्रेस – वंचित – संभाजी ब्रिगेडने केले मोठे शक्ती प्रदर्शन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 उमेदवाराने आणली चक्क 10 हजार रुपयाची चिल्लर

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड- कंधार विधानसभेसाठी भाजपा-कॉग्रेस-वंचित-संभाजी ब्रिागेड- बसपा, इंडीयन युनियन मुस्लीम लीग या प्रमुखासह अपक्ष 12 उमेदवारांनी 15 उमेदवारी अर्ज दि. 04 रोजी निवडणुक विभागाकडे भरण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांनी दिली. यात दि. 03 ऑक्टोबर रोजी 2 उमेदवारी अर्ज तर दि. 04 ऑक्टोबर 11  उमेदवारांनी 13 उमेदवारी अर्ज भरलेले आहेत.

यात भाजपाकडुन डॉ. तुषार गोविंदराव राठोड, कॉग्रेसकडुन भाऊसाहेब खुशालराव पाटील, वंचितकडुन जीवण विठठलराव दरेगावे, संभाजी ब्रिागेड कडुन बालाजी जनार्धन आगलावे, बसपाकडुन जितेंद्र दशरथ वाघमारे, इंडीयन युनियन मुस्लीम लीग कडुन रफिक खाजामियाँ अहमद तर अपक्ष म्हणुन पंजाबराव श्रीहरी वडजे, लक्ष्मण उध्दव गोमारे, शंकर माधव घोडके, अनिल तेजेराव सिरसे, रविंद्र जगन सोनकांबळे, संभाजी गंगाराम लवटे या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी दाखल केले.

यामध्ये भाजपाचे आ.डॉ. तुषार राठोड यांनी व कॉग्रेसचे भाऊसाहेब पा. मंडलापुरकर यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करुन आपली उमेदवारी अर्ज दाखल केली. तर भाजपाकडुन खा. प्रताप पा चिखलीकर, मा.खा भास्करराव पा. खतगांवकर, मा.आ. किशनराव राठोड, आ.राम पाटील रातोळीकर, मा.आ. अविनाश घाटे, व.ना.महामंडळ उपाध्यक्ष देविदास राठोड यांच्यासह अनेकांनी उपस्थिती होती तर कॉग्रेसकडुन मा.जि. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, कॉग्रसचे जेष्ठ नेते शेषेराव चव्हाण, किशोर स्वामी, सुभाष पाटील दापकेकर, जि.प. सदस्य दशरथ लोहबंदे, जिप. प्रतिनिधी संतोष बोनलेवाड, नंदकुमार मडगुलवार, उत्तम अण्णा चौधरी यांच्यासह अनेकांनी उपस्थिती होती.

तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुध्दा मोठे शक्ती प्रदर्शन करुन आपली वंचिताची शक्ती दाखवली यात उमेदवार जीवण दरेगावे, संजय भारदे, कल्याण दरेगावे, गजभारे, श्रावण नरबागे यांच्यासह अनेकांनी उपस्थिती तर संभजी ब्रिागेडच्या वतीने बालाजी पाटील व त्याच्या समर्थकासह बैलगाडी रॅली काढुन मोठे शक्ती प्रदर्शन केले.

………………………………………………………….
संभाजी गंगाराम लवटे या उमेदवाराने चक्क 10 हजार रुपयाची चिल्लर आपले डिपॉझिट भरायला आनली. ही चिल्ली मोजण्यासाठी निवडणूक विभागाचे सहा कर्मचारी लागल्याने निवडणूक विभागाची तारांबळ उडाली.