गोजेगाव स्टेट बँकेचे नामफलकच गायब…ग्राहकांची गैरसोय

नांदेड जिल्हा मुखेड
 दत्ता पाटील माळेगावे
                    मुक्रमाबाद : मुखेड तालुक्यातील गोजेगाव येथील स्टेट बँकेचे​ स्थलांतर होऊन बरेच दिवस झाले आहे. परंतु नव्याने स्थलांतरित झालेल्या ठिकाणी आज पर्यंत शाखेचे नामफलक न लावण्यात आल्यामुळे. शेतकऱ्यासह  खातेदार संमभ्रमात पडत आहेत.
                 गेल्या अनेक वर्षापासुन गोजेगाव येथील स्टेट बँक आँफ इंडीया च्या अपुऱ्या जागेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय हौत असल्यामुळे कांही महिन्या पुर्वी बँकेचे दुसऱ्या ठिकाणी स्थालंतर झाले असले तरी शाखा व्यवस्थापकाने तसे शाखेचे नामफलक लावणे गरजेचे होते.पण याचा त्यांना विसर पडल्यामुळे शेतकऱ्यासह नागरीक हैराण होताना दिसुन येत आहेत.
                      या ठिकाणी  ग्राहकांची, शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची पंचायत होत आहे.काही शेतकऱ्यांना कामे धंदे सोडून बँकेला यावे लागत आहे पण बँकेचे नामफलक नसल्याने बँक कुठे आहे हेच कळत नाही. त्यामुळे बँकेचा नामफलक लावल्यास शेतकऱ्यांची, ग्राहकांची पंचायत होणार नाही. आणि याठिकाणी बँकचं नामफलक लावल्यास बँक आहे हे नक्कीच कळेल असे नागरिकांतुन बोलले जाते