मुखेड –  कंधार विधानसभेसाठी एकमेव अर्ज दाखल..यांनी भरला अर्ज तर यांनी घेतला उमेदवारी अर्ज

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

         शुक्रवारी भाजप-कॉंग्रेस-संभाजी ब्रिगेडसह अनेकांचे शक्तीप्रदर्शन  

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

                  मुखेड –  कंधार विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी केवळ आमदार डाॅ. तुषार राठोड यांचा एकमेव भाजपकडून व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला तर आजपर्यंत एकूण 63 व्यक्तीने 91 उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती निवडणूक विभागातून मिळाली आहे. दरम्यान भाजपा शिवसेना युवतीचे उमेदवार आ.डाॅ. तुषार राठोड हे आज मोठे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

 

                आज अर्ज घेतलेल्या यादीत विजय दरेगावे, यशवंत दरेगावे, शिवाजी गेडेवाड, जीवन दरेगावे, अनिल सिरसे, अरुण सोनटक्के, रेणुकादास पत्की, शंकर माधवराव पाटील, रवींद्र सोनटक्के, लक्ष्मन गोमारे, शंकर लुटे, दयानंद देशमुख, बालाजी वडजे, पंजाबराव वडजे, बालाजी कार्लेकर, भाऊसाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतला.

 

                  भाजपकडून विद्यमान आमदारांना उमेदवारी घोषित झाली असून कॉंग्रेसकडून अद्याप उमेदवार घोषित झाला नाही. त्यामुळे जनतेते कॉंग्रेस उमेदवाराबाबत दिवसभर तर्क वितर्क लावून अनेकांची नावे सोशल मीडियात फिरताना दिसत होती.