डोरनाळी येथील ग्रा.पं.कार्यालयात महात्मा गांधी यांची जयंती साजरी

नांदेड जिल्हा मुखेड

“स्वच्छता ही सेवा”  प्लास्टिक बंदिचा दिला संदेश

 

            मुखेड : महात्मा गांधी यांची १५० वी जयंती मुखेड तालुक्यातील डोरनाळी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दि ०२ आॅक्टोंबर रोजी साजरी करण्यात आली तसेच महात्मा गांधी यांच्या जंयती दिनापासुन देशात एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिक बंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असुन त्या अनुषंगाने प्लाॅस्टीक बंदिचा संदेश नागरिकां पर्यंत पोहचवण्यासाठी सौ.महानंदा देवकत्ते व ग्रामसेविका कु.आर.जि.अभुंरे यांच्या हस्ते “स्वच्छता हि सेवा ” अभियानाचा शुभारंभ करण्यात आले.

 

ग्रामपंचायत कार्यालय डोरनाळी येथे दि.२ आॅक्टोबंर रोजी सकाळी ८ :३० वाजता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस संरपंच सौ.महानंदा देवकत्ते,ग्रामसेविका कु.आर.जी.अभुंरे, ग्रामपंचायत सदस्या सौ.महादाबाई शिंदे, सौ.मालनबी शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व त्यानंतर प्लाॅस्टिकचा वापर सर्वत्र होतो पण एकदा वापरातील प्लाॅस्टिक नक्की कोणत्या आहेत याबाबत नागरिकात संभ्रम निर्माण झाला आसुन त्याबाबतचे दुष्परिणाम समाज जीवनावर होत आहे.

 

                  त्यामुळे एकदा वापराच्या प्लास्टिकचे होणारे दुष्परीणाम समजावून सांगण्याच्या दृष्टिकोनातुन डोरनाळी ग्राम पंचायतीच्या वतीने प्लाॅस्टिकचा कचरा जमा करून नागरिकांना प्लाॅस्टिक बंदिची माहिती देण्याच्या अनुषंगाने नागरिकांपर्यंत प्लाॅस्टिक बंदिचा सदेश व जनजागृती करण्याच्या संंदर्भात बुधवार दि.२ रोजी संंरपंच, ग्रामसेवीका व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला यावेळी राजु देवकत्ते, चिन्नुमीयाँसाब शेख, विश्वाबंर लालवंडे, मुस्तफा शेख, मस्तान शेख सह नागरिक उपस्थित होते.