भाजप प्रदेशाध्यक्षाची सीटच धोक्यात.. ?

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण
              कोथरुड मतदारसंघ चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर भाजपसाठी अवघड बनत असून  चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला होणारा विरोध असाच राहिला तर त्यांना पराभवाचा धक्का देखील सहन करावा लागू शकतो, अशी सध्याची परिस्थिती आहे.
          भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करुन चंद्रकांत पाटील यांना भाजपनं याठिकाणी उमेदवारी दिली आहे. मेधा कुलकर्णी यांच्यापेक्षा जास्त दावेदार मानले जाणारे मुरलीधर मोहोळ देखील या उमेदवारीनं चक्रावले आहेत.