तीन दिवसात 40 वर्षाच्या राजकारणाला मुठमाती करणारा “बाहुबली” “रामदास पाटील”

इतर लेख ठळक घडामोडी संपादकीय

ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जिने में,

             बडे बडे तुफान भी थम जाते है जब आग लगी हो सिने में..!

               मुखेड – कंधार मतदारसंघात अनेक बडे नेते , पदाधिकारी आहेत. तसा तालुका व्हिव्हिआयपी नेत्यांचा तालुका म्हणुन नांदेड जिल्हयात ओळख. या मतदार संघात रावणगांवकर, घाटे, साबणे, गोजेगावकर, बेटमोगरेकर व राठोड यासारख्या मोठया राजकीय नेत्यांचे वलय पण या 2019 च्या निवडणुकीत एक नवा चेहरा उदयास आला आणि तो म्हणजे रामदास पाटील.

         मुखेड – कंधार मतदार संघातील प्रत्येक घरा-घरापर्यंत रामदास पाटील या नावाची वादळी चर्चा आहे. भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांचे सिग्नल मिळताच त्यांनी मुखेड- कंधार मतदार संघात त्यांनी आपले आगेकुच सुरु करुन केवळ तीन दिवस मुखेड – कंधार मतदार संघात येऊन 40 वर्षापासुन राठोड घराणे राजकीय क्षेत्रात असलेले व विद्यमान आमदार सुध्दा सध्या असताना अशा राजकीय घराण्याला राजकीय मुठमाती करण्याचे काम त्यांनी केले.

                  केवळ तीन महिण्याच्या अगोदर ज्यांना तीकीट मिळाल्यातच जमा होते अशावेळी मतदार संघातील प्रत्येक बुथवर रामदास पाटील यांनी आपले कार्येकर्ते तयार करुन मोठी यंत्रणा कमी वेळात तयार केली. मतदार संघात 341 बुथ, 9 जि.प. सर्कल व 14 पंचायत समिती गण असताना अशा वेगळवेळी कमीटया कमी वेळात बनवुन त्या त्या ठिकाणी कार्यकर्ते जोडण्याचे काम त्यांनी अत्यंत कमी वेळात करुन विद्यमान आमदारांना जे सत्ता, कायकर्ते, संस्था ,पदाधिकारी असुन जमले नाही ते त्यांनी करुन दाखवुन आपले राजकीय कौशल्य दाखवुन दिले.

                 आज जरी रामदास पाटील यांना तिकीट मिळाले नसले तरी प्रत्येक बुथवर त्यांचा कार्यकर्ता आजही तयार आहे. मोठी यंत्रणा त्यांच्यासोबत आहे. रामदास पाटील हे मुळ स्वंयसेवक असल्याने पक्षश्रेष्ठीचा निर्णय माझ्यासाठी अंतीम राहील असे सांगुन त्यांनी पक्षाविषयी आपली निष्ठा व्यक्त केली. आज कोणाला तिकीट मिळाले नसले तरी लगेच बंडाचा झेंडा पुढे करतात पण रामदास पाटील यांच्या नावातच राम असल्याने त्यांनी त्यांना नावारुपी मुखेड – कंधार मतदार संघात आपले जाळे निमाण करुन किंग ही आपण आणि किंगमेकरही आपणच हे सिध्द केले आहे.

                रामदास पाटील मुळचे सोमठाना (मुखेड बाँड्री पासुन 3 कि.मी. अंतरावर) असले मुखेड – कंधार मतदार संघात अनेक वर्षापासुन राहत आहेत अशी भावना प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात तयार केली. या निवडणुकीत अनेकांनी त्यांच्या दिव्यांगावर जाऊन अपशब्द वापरले पण त्यांनी कधीही कोणाला वाईट शब्दात उत्तर दिले नाही. मुखेड- कंधार मतदार संघात त्यांचा चाहता वर्ग मोठा बनला असुन तसा त्यांचा समाजही मोठया प्रमाणात असुन कोणाला आमदार करायचे आणि कोणाला पाडायचे हे ते ठरवू शकतात इथपर्यत त्यांची ताकत आहे.

               हिंगोलीच्या मुख्याधिकारी पदी असलेले रामदास पाटील सर्वस्व सोडुन भाजपाच्या तिकीटावर लढण्यासाठी तयार झाले. आणि मोठी यंत्रणा व जनतेचा प्रतिसाद पाहता त्यांना तिकीट मिळणे सुध्दा अपेक्षीत होते तर शेवटच्या क्षणापर्यंत रामदास पाटील यांचे नाव फायनल होते पण पक्षश्रेष्ठींनी त्यांना यावेळेस निवडणुक न लढण्याचे आदेश दिले यावेळी तालुक्यातील अनेकांचा हिरमुड झाला तरीही त्यांनी सर्वांना शांततेचे आवाहन करीत आपल्या समर्थकांना पक्षश्रेष्ठींचा आदेश हा अंतीम आदेश म्हणत शांत केले तर आदेश माननारा हाच खरा स्वंयसेवक हे सुध्दा त्यांनी आपले हेच उदाहरण देत दाखवुन दिले.

                  रामदास पाटील यांची पुढील राजकीय कारकिर्द काय आहे मला माहित नसले तरी पुढील आयुष्यात त्यांना मोठे सितारे आहेत हे नक्की. पक्षाने जरी त्यांची उमेदवारी कापली असली तरी पक्षच पुढे योग्य न्याय देईल अशी अपेक्षा करु…………

धन्यवाद…..

  ज्ञानेश्वर डोईजड
मुखेड, 7875782377