पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये नमिता मुंदडा यांचा भाजपामध्ये प्रवेश

ठळक घडामोडी मराठवाडा राजकारण

     लोकभारत न्यूज नेटवर्क

 

             बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातून पाच उमेदवारांची घोषणा केली होती.

                 त्यामधील केज विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी तडकाफडकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये नमिता मुंदडा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.