प्रफुल पटेल यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

ठळक घडामोडी महाराष्ट्र

               नागपूर | माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या ताफ्यातील गाडीला आज पहाटे अपघात झाला. या अपघातात सुरक्षा ताफ्यातील तिघेजण जखमी झाले आहेत. प्रफुल पटेल हे भंडारा मार्गे नागपूरला येत असताना पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात कोडोली शिवारात सुरक्षा रक्षकांची कार व कंटेनरची धडक झाली.

            या अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एक सहायक पोलीस निरीक्षक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी नागपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.