येथे अवैधरित्या रसायन मिश्रीत गावठी दारु तयार करणाऱ्या अड्डयावर मुक्रमाबाद पोलीसानी धाड

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

नांदेड : प्रतिनिधी

         मुखेड तालुक्यातील गोजेगाव येथे अवैध्द रित्या रसायन मिश्रीत गावठी दारु तयार करणाऱ्या अड्डयावर मुक्रमाबाद पोलीसानी धाड टाकून १५० लिटर दारु अंदाजे पंधरा हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करुण दि.२८ सप्टेंबर रोजी मुक्रमाबाद पोलीस स्टेशन मध्ये पाच जणा विरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्रमाबाद सह परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून अवैध्द रित्या रसायन मिश्रीत दारु तयार करणे व ती विकणे जोरात सुरु होते.हि रसायण मिश्रीत दारु पिऊन अनेक तरुणाचे जिव गेले आहेत तर अनेकांचे संसार उघडयावर आल्यामुळे हि गावठी दारु बंद करण्याची मागणी महिलासह नागरिकातून होत आहे.
यामुळे आचार सहितेच्या काळात मिळालेल्या गुप्त माहितीवरून सपोनि कमलाकर गड्डीमे यांच्या पोलीस पथकांनी गोजेगाव येथे रसायन मिश्रीत गावठी तयार करणे व अवैध्द रित्या गावटी दारु विकणार्या अड्डयावर धाड टाकून पंधार हजार रुपयेची गावठी दारु पकडून मुसक्या आवळल्या तिन दिवसात मुक्रमाबाद पोलीसांची तिसरी कामगिरी आहे.

याप्रकरणी मुक्रमाबाद पोलीस स्टेशन मध्ये बाबु टोपाजी जाधव ,जिजाबाई अर्जुन ,सरुबाई जाधव,प्रेमलाबाई जाधव , राजीव जाधव सर्व रा.गोजेगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि कमलाकर गड्डीमे करीत आहेत याकामी गोपनीयशाखेचे माधव जळकोटे,रणजीत मुदीराज,सुर्यतळे,चालक गायकवाड आदीने सहकार्य केले.