ग्रामीण महाविद्यालयात सोलार निर्मिती कार्यशाळेचे आयोजन

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड :अपारंपारिक ऊर्जेचा विद्यार्थ्यांमध्ये प्रसार करून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून सौर ऊर्जा दूत घडवण्याच्या भूमिकेतून आय.आय.टी. मुंबई व अपारंपारिक ऊर्जा मंत्रालय भारत सरकार आणि ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड येथील भौतिकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 150व्या म.गांधी जयंती निमित्त सोलार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

        महाविद्यालयात दिनांक 1 ऑक्‍टोबर २०१९ रोजी मुखेड परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोलार लंप बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन वै.धुंडा महाराज महाविद्यालय देगलुरचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.संजय अवधाने यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड हे राहाणार आहेत. या कार्यशाळेसाठी मुखेड परिसरातील 50 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

 

        प्रशिक्षणानंतर सहभागी विद्यार्थ्यांना सोलार लॅम्प आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे तरी या परिसरातील विद्यार्थ्यांसह जिज्ञासू पालकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. देविदास केंद्रे आणि प्रा. डॉ. मदन गिरी यांनी केले आहे.