हिंगोली जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी माधवराव हुंडेकर यांचा सत्कार

नांदेड जिल्हा हदगाव

हदगाव : देवानंद हुंडेकर

             हिंगोली जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी माधवराव हुंडेकर त्यांचा सत्कार महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष अरविंद भाऊ हुंडेकर संतोष बेळकोणे देवानंद हुंडेकर यांनी केला.

        त्यांची नियुक्ती अगदी थोड्या दिवसांपूर्वी बाळापूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर झालेली आहे रवी माधव हुंडेकर अगोदर रिसोड येथे उपसहायक निरीक्षक पदावर कार्यरत होते व मेहकर या गावी सुद्धा साहेब निरीक्षक पदावर कार्यरत होते तेथील बदली जनतेच्या मनावर घर करून गेली .

         सहाय्यक निरीक्षक पदावर असताना त्यांनी केलेली कामगिरी जनतेच्या मनात अगदी ठासून बसलेले आहे तेथील कार्य त्यांचे सक्षम होते आता हिंगोली जिल्ह्यात नव्याने रुजू झाल्यामुळे जनसामान्यातून त्यांचे कौतुक होत आहे आणि हिंगोली जिल्ह्यातल्या बाळापूर परिसरातील अवैध धंद्याला आळा बसणार आहे