महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मुदखेड तालुकाध्यक्षपदी प्रताप देशमुख बारडकर तर सरचिटणीसपदी रुखमाजी शिंदे डोंगरगांवकर यांची बिनविरोध निवड

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुदखेड

रुखमाजी शिंदे

मुदखेड : तालुक्यातील बारड येथील ज्येष्ठ पत्रकार प्रताप देशमुख बारडकर यांची नुतन तालुकाध्यक्ष म्हणून तर सरचिटणीसपदी रुखमाजी शिंदे डोंगरगांवकर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

          नूतन पदाधिकाऱ्यांना मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस रुपेश पाडमुख आणि जिल्हाध्यक्ष रमेश पांडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्याकामी अग्रेसर असणारे संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सर्वांना परिचित आहे.ग्रामीण तसेच शहरी भागातील पत्रकारांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे काम या संघाच्या माध्यमातून केले जाते.

            मुदखेड तालुक्यातील पत्रकार संघाचे संघटन वाढवून तालुक्यातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार प्रदेश सरचिटणीस रुपेश पाडमुख जिल्हाध्यक्ष रमेश पांडे यांनी केले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ग्रामीण आणि शहरी अशा दोंन्हीही भागातील पत्रकारांसाठी संरक्षण कायदा त्वरित अंमलात आणावा म्हणून सातत्याने पुढाकार घेणारी संघटना आहे.पत्रकारांच्या हक्कासाठी सरकार दरबारी झगडणारी संघटना म्हणून याकडे पाहिले जाते.

              पत्रकारांचा दहा लाखांचा विमा काढणारी ही पहिली संघटना असून दुचाकीवरून वृत्त संकलनासाठी फिरणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेसाठी त्यांना मोफत हेल्मेट वाटप करणारी संघटना म्हणूनही मराठी पत्रकार संघाकडे पाहिले जाते.प्रताप देशमुख बारडकर आणि रुखमाजी शिंदे डोंगरगांवकर या निवडीबद्दल जेष्ठ पत्रकार देवानंद गुंजाळ,माजी तालुकाध्यक्ष मनोज कमठे,माजी तालुकाध्यक्ष गंगाधर डांगे,माजी तालुकाध्यक्ष ईश्वर पिन्नलवार,दिनेश शर्मा,नामदेव बिच्चेवार,अशिष कल्याणे,पिराजी गाडेकर,निळकंठ पडोळे,उत्तम हनुमंते,प्रल्हाद मस्के,साहेबराव गागलवाड यांच्यासह अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.