वाळकी बाजार येथे माता ईसाई देवीच्या मंदीरात आज घटस्थापना…अनेक वर्षा पासूनची परंपरा असल्याने भावीक भक्तांची देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी

नांदेड जिल्हा हदगाव

देवांनद हूंडेकर

 

         हदगाव : तालुक्यातील वाळकी बाजार येथील जाग्रत देवस्थान आसलेले माता इसाई देवीच्या मंदीरात दर वर्षी प्रमाणे नुकतेच घटस्थापना करुन यात्रेला आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला आसुन या ठिकाणी महाराष्ट्र भरातुन भावीक भक्त मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत आसतात.

           हदगाव हिमायतनगर रोडवर आसलेल्या वाळकी बाजार या गावात दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी माता इसाई देवीच्या मंदीरात घटस्थापना करण्यात आली आहे.माता इसाई देवीची चुलीमध्ये मुर्ती हे निद्र आवस्थमध्ये आसुन या मंदीराची निर्मीती सुमारे हाजारो वर्षापुर्वीची आसुन देवीचे मंदीर हे चिरेबंदी व हेमाडपंती आसुन या ठिकाणी देवीच्या मुख्य प्रवेशव्दारा समोर एक मातीची व दोन भवे आशा चिरबंदी दिपमाळ आसुन त्या ठिकाणी भावीक आपली मनपुर्वक कामना झाल्याने त्या दिपमाळीमध्ये मोठ्या श्रंध्देने तेल टाकुन दिपमाळ जोत पेटवितात व  आपली भावना पुर्ण करत आसल्याचे येथील पुजारी विठ्ठलराव धर्माजी गायकवाड यांनी सागितले आहे.

          देवी इसाई या देवस्थाना बद्दल पत्रकारानी पुजारी विठ्ठलराव गायकवाड यांना माहीती विचारली आसता त्यांनी देवस्थाना बद्दल माहीती देताना म्हणाले की,माता इसाई देवीच्या जन्मा बद्दल सागायचे म्हटले तर माता इसाई देवी हे पुजार्‍याच्या घरामधील चुलीमध्ये बैलभंडार आडळुन आला आसता हाच माझा जन्म आसल्याचे पुज्यार्‍याना देवीने सागितले. आसी माता इसाई देवीच्या जन्मा बद्दलची आख्याकीका आसल्याचे बोलल्या जात आहे.तसेच माता इसाई देवीच्या घटस्थापने पासुन गावामध्ये विविध धार्मीक कार्यक्रम चालु आसल्याने गावात भक्तीमय वातावरण निर्माण आहे.

         जाग्रत देवस्थान आसलेल्या वाळकी बाजार येथील घटस्थापने पासुन दररोज सकाळी ७-३० वाजता ते संध्याकाळी ७-३० वाजता नियमीत आरती होतो.तसेच सकाळ पासुन सायकाळ पर्यत महाप्रसादाचा कार्यक्रम दिनांक २९ सप्टेंबर पासुन नव दिवस सतत कार्यक्रम चालु आसतात.दर वर्षी भावीक मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी येतात.

          वेगवेगळ्या प्रकारचे देवीच्या मंदीरात गोंधळ ही होतात.देवीचे घटस्थापना करण्यासाठी ज्या शेतकर्‍याच्या शेतात ऊस आसेल तर तो शेतकरी ऊस देवीच्या घटस्थापना करण्यासाठी आणुन देतात.आसे ही पुजारी यांनी माहीती देताना सागितले.आसुन या ठिकाणी भावीक भक्तांची मोठ्या संख्यने गर्दी होतांना दिसून येत आहे .