भिमराव क्षिरसागर यांनी TRS कडून निवडणूक लढवावी

नांदेड जिल्हा बिलोली राजकारण

रविवार, सप्टेंबर २९, २०१९

बिलोली / प्रतिनिधी
भाजप सेना युतीचे गणित न जमण्यासारखे असल्याने भाजप चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भिमराव क्षिरसागर हे काढता पाय घेत जनतेच्या इच्छेप्रमाणे टीआरएस पक्षाकडून बिलोली देगलूर मतदार संघात निवडणूक लढावे अशी इच्छा जनसामान्यातून बोलले जात असल्याने ते टीआरएस पक्षाकडून लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांचे निकटवर्तीय डॉ. लक्ष्मीकांत कलमूर्गे यांच्याकडून कळाले आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा लवकरच करणार असल्याचेही सांगितले आहेत. भीमराव क्षिरसागर यांच्या या एन्ट्री ने टीआरएस पक्षाचे पारडे मात्र नक्कीच जड होईल आणि भीमराव क्षीरसागर हे विजयी होतील, यामुळे चौरंगी लढतीची शक्यता वाटत आहे.

टीआरएस पक्षाने तिकीट दिल्यास त्यांचा विजय निश्चित होईल तसेच सेना भाजपचे नाराज कार्यकर्ते पण त्यांना मदत करतील आणि त्यांना निवडून आणण्यास प्रयत्न करणार असल्याचेही जनमानसात ऐकावयास मिळत आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून भाजप पक्षात कार्य करीत असून त्यांच्या युतीमुळे शिवसेनेच्या सुभाष साबणे याना तिकीट दिले असल्याने , जनतेच्या इच्छेप्रमाणे टीआरएस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी सांगितले आहेत. सहानुभूतीची लाट यांना तारणार का विद्यमान आमदार सुभाष साबणे यांच्यावर असलेल्या नाराजीचा सूर आणि त्यांच्यावरचा रोष गावबंदी करीत दाखवत असून, यांना तारणार हे येणारा काळच ठरवेल. विकासात्मक दृष्टिकोन दूरदृष्टी ठेवणारा नेता म्हणून जनसामान्यात यांची ओळख असून अनेकांचा वाढता प्रतिसादाला पाहून निर्णय हे मतदारराजा योग्य ते निर्णय घेतीलच पण चौरंगी लढतीत ही विधानसभा निवडणूक पहावयास मिळणार आहे.