बुधवारी झोनल अधिकारी , केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांचे निवडणुकीसाठी प्रशिक्षण

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
प्रशिक्षनास अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कार्यवाही – निवडणूक निर्णय अधिकारी  शक्ती कदम 

ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड – कंधार विधानसभा निवडणुक 2019 च्या अनुषंगाने निवडणुक प्रक्रियेच्या कामाला मुखेडची निवडणूक  यंत्रणा झपाटयाने कामाला लागले असुन तालुका प्रशासनही निवडणूकीच्या कामाला सज्ज झाले आहे.

निवडणूकीसाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिल्ला टप्यातील प्रशिक्षण दि. 02 ऑक्टोबर रोजी मुखेड येथील आर्य वैश्य मंगल कार्यालय पी.पी.टी. व्दारे प्रशिक्षण देण्यात येणार असुन व जिल्हा परिषद हायस्कुल मुलींचे मुखेड येथे मतदान यंत्राचे प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहे.

सर्व प्रशिक्षणार्थी यांना मतदानाची सर्व प्रकिया पुर्ण कशी करावी व मतदान यंत्र यात बॅलेट मशीन, कंट्रोल युनीट व व्हि.व्हि.पॅट अशा तीनही मशीनची माहिती व प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहे.

तरी या प्रशिक्षणास सर्व केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी , क्षेत्रीय अधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांनी केले आहे. ज्यांनी आदेश प्राप्त होऊन ही या बैठकीस अनुउपस्थित राहिल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल असेही निवडणू निर्णय अधिकारी म्हणाले.

तसेच दि. 28 रोजी झालेल्या बि.एल.ओ. च्या बैठकीचे आयोजन मुखेड तहसिल कार्यालयात केले होते. सर्व बि.एल.ओ. यांना मतदान कार्ड राहिेलेले सर्वांना वितरीत करण्याच्या व मतदान केंद्र सुव्यवस्थित आहेत की नाही या सर्व बाबींची माहिती दण्याच्या सुचना निवडणुक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांनी दिल्या.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसिलदार काशिनाथ, तहसिलदार काशिनाथ पाटील, नायब तहसिलदार मकरंद दिवाकर, म्एस.एस. मामीलवाड, पी डी गंगनर यांच्यासह निवडणुक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.