भानेगाव येथील माजी सरपंच अतुल इंगळे (पाटिल) यांच्या सहकार्यातून डायलिसिसच्या रुग्णास दिले ऑक्सिजन सिलेंडर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा हदगाव
देवानंद हुंडेकर
                   हदगाव – तालुक्यातील भानेगाव येथील माजी सरपंच अतुल इंगळे (पाटिल)यांनी अवघ्या 26व्या वर्षी सरपंच पद भूषऊन गावकऱ्यांची सेवा केली.
                मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले अतुल इंगळे नेहमीच गोरगरीब, जनतेच्या खाजगी, शासकीय कोणत्याही कामाकरिता  सदैव धावून जातात म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख  निर्माण केली असून सरपंच पद असताना त्यांनी भानेगाव मध्ये विविध विकास कामे आणली.
              राजकारनात असले तरी मात्र अतुल इंगळे यांनी समाजकारण करणे विसरेल नाही याचे उदाहरण सांगायचे झाल्यास भानेगाव येथील पिंटू सिगंनवाड यांना डायलीसिस चालू असून या रुग्णास श्वासोश्वावास घेण्यासाठी कधी कधी त्रास होत आहे याची माहिती लागतच माजी सरपंच अतुल इंगळे (पाटिल)यांनी या रुग्णास ऑक्सिजन सिलेंडर देण्याचे ठरवले होते.
                    त्यामुळे कुमार देशमुख व  अतुल इंगळे  यांच्या सहकार्याने आज भानेगाव येथील पिंटू सिंगनवाड यांना ऑक्सिजन ग्यास सिलेंडर देण्यात आले यावेळी पत्रकार प्रवीण दुधारे संदीप सोनूले शुभम तूपकरी सामजिक कार्यकर्ते के.डी पवार बालाजी रणवीर व विचार संघर्ष न्यूज़ पोर्टल चे संपादक अरविंद भोरे आणि इतर कार्यकर्त्या सह मित्र मंडळीं उपस्तीत असून अतुल इंगळे(पाटिल)यांचे सर्व स्थरातून स्वागत होत आहे.