सर्वांना वेदना झाल्या..दिलगिरी व्यक्त करतो – अजित पवार

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

लोकभारत न्यूज नेटवर्क

            राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर गायब होते.  मात्र आज  दुपारी 1 च्या सुमारास ते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल होऊन  शरद पवारांच्या घरी पवार कुटुंबीयांची बैठक झाली. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषदेत माहिती देऊ असं सांगितलं.

 

                आज झालेल्या पत्रकार अजित पवार म्हणाले की , या राजीनामामुळे आमचे कार्यकर्ते, हितचिंतक असतील , या सर्वांना वेदना झाल्या. त्यांना कळलं नाही की मी न विचारता राजीनामा का दिला. असाच प्रसंग मागे उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झाला होता. मी सांगू इच्छितो की असा प्रसंग येतो तेव्हा, जयंतराव, भुजबळ, तटकरे किंवा दिग्गज नेत्यांना सांगितलं असतं. ती माझी चूक होती की नव्हती, त्याच्या खोलात मी जात नाही. त्यांना मी न सांगता हा निर्णय घेतला, त्याबद्दल मी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो.