भाजप सरकारला शिव्या देत गोपीचंद पडळकर भाजपच्याच वाटेवर !

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण
लोकभारत न्यूज नेटवर्क
      लोकसभे पूर्वी भाजप सरकारला शिव्या देत असतानाचे गोपीचंद पडळकर यांचे अनेक भाषणे गाजले अन लोकसभेला वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.
       पण आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला असून महासचिव गोपीचंद पडळकर यांचा पक्षाचा राजीनामा दिला असून आपण आजपासून वंचितचे काम थांबवणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलं आहे.
       पुढील राजकीय भूमिका दोन दिवसांत जाहीर करणार करणार असल्याचंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात पण ते भाजपच्या वाटेवर असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे .