जिल्हाधीकारी डोंगरे यांची मुखेड तहसीलला भेट निवडणूकीच्या अनुषंगाने घेतला आढावा

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

            मुखेड कंधार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुखेड तहसील कार्यालय (नवीन इमारत ) येथे जिल्हाधिकारी अरुणकुमार डोंगरे यांनी दि २६ रोजी दुपारी ३.३० वाजता भेट दिली.

 

             या भेटीत स्ट्रॉग रूम , मतमोजणी कक्ष व विविध निवडणुकी संदर्भात स्थापन केलेल्या विविध कक्षास भेट देऊन आढावा घेवून निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना योग्य सूचना दिल्या.

     यावेळी नांदेड पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, देगलूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी शक्ती कदम , पोलीस उपविभागीय अधिकारी धुमाळ , तहसीलदार काशिनाथ पाटील, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे ,पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे, नायब तहसीलदार पी डी गंगनर , मामीलवाड यांच्यासह  निवडणूक विभागाचे अधिकारी, आचारसंहिता प्रमुख, झोनल अधिकारी तसेच निवडणूक संदर्भात सर्व अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.