पतसंस्थेच्या वार्षिक अहवाल छपाईवर लाखो रुपयाची उधळपट्टी!

नांदेड नांदेड जिल्हा

नांंदेड- जिल्ह्यातील शिक्षण सहकारी पतपेढी शिक्षण विभाग जि.प. नांंदेड ची स्वभांडवलावर असलेली पतसंस्था सध्या उधळपट्टीच्या विळख्यात सापडली आहे.

         इ.स.२०१८-१९ आर्थिक वर्षातील तेरीजपत्रक सर्वसाधारण सभा होण्यापुर्वी सभासदांना सहकार अधिनियम नुसार १५ दिवस अगोदर देणे बंधनकारक आहे. पण ते तसे होत नाही या आणि इतर अनेक प्रश्नांवरुन संचालकांना शिक्षक सेनेकडून घेराव घालणार असल्याचा इशारा शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी दिला आहे.

शिक्षण पतपेढी सहकारी पतसंस्था जि.प.नांंदेडची आमसभा येत्या २९ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. पतसंस्थेचे विद्यमान सत्ताधारी संचालक सभेचे विषय छापलेले केवळ एका पानाची नोटीस देतात. आणि त्यामध्ये लिहिलेले असते आपणास काही प्रश्न विचारायचे असल्यास सात दिवस अगोदर पतसंस्थेला कळवावे. सभासद त्या साध्या नोटीसीवर कसे प्रश्न विचारणार? यासाठी वार्षिक अहवाल छापला जातो तो मात्र सभेच्या दिवशी दिला जातो. आता कसे प्रश्न, शंका विचारणार? पतसंस्थेचे एकुण सभासद ६ हजार इतके आहेत.

        ६ हजार वार्षिक अहवाल छपाई केल्याचे दाखवतात. प्रत्यक्षात मात्र १ते दीड हजार छापून आमसभेच्या दिवशीच वाटप करतात. यावर जवळपास एक लाख ८० हजार रुपये खर्च होतो. हा एवढा लाखो रुपये खर्च कोणासाठी? जर सर्वच सभासदांना लेखाजोखा मिळत नसेल तर ही उलाढाल कशाला? हे सत्ताधारी संचालक यामध्ये लाखो रुपयाचा डल्ला या पैशावर मारतात.

         अहवाल कुणासाठी? ही सभासदांची फसवणूक आहे. आर्थिक लूट आहे. हे संचालक मंडळ अभ्यासदौरे करुनही कोणताही फायदा झाला नाही. सहकार नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही. ही फसवणूक थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांंदेड च्या वतीने संतोष अंबुलगेकर, रवी बंडेवार, गंगाधर कदम, विठ्ठलराव देशटवाड, श्रीरंग बिरादार, मनोहर भंडेवार, अविनाश चिद्रावार, बालाजी राजूरवार, गंगाधर ढवळे, गोविंद सुवर्णकार, बालाजी पेटेकर, शिवराज मुंढे, अरुण भारदे यांनी मा. जिल्हा उपनिबंक नांंदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.