शरद पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा मुखेडात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निषेध

नांदेड जिल्हा मुखेड

ज्ञानेश्वर डोईजड

           मुखेड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर ईडी ने केलेल्या कारवाईचा मुखेड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने दि.25 रोजी मुखेड तहसीलदार काशीनाथ पाटील यांना निवेदनद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडी ने सुडबुध्दीने राजकीय आकासा पोटी गुन्हे दाखल केले असून शरदचंद्र पवार हे बँकेचे संचालक नसतानाही केवळ आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना आणि राज्यातील युवकांचा पवार साहेबांना प्रतिसाद मिळत आहे म्हणून राजकीय षडयंत्र रचविण्याचे काम सत्ताधारी पक्षाच्यावतीने केले जात आहे.

 

         ईडी ने गुन्हे दाखल केल्याने राज्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने मोर्चे, आंदोलने करून या कारवाईचा निषेध होत आहे. त्याच अनुषंगाने मुखेड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसीलदार यांना निषेध म्हणून निवेदन देण्यात आले.

यावेळी मुखेड रा. कॉग्रेस ता.अध्यक्ष शिवाजी जाधव, नांदेड रा. कांग्रेस सो. मि. सेल जिल्हाअध्यक्ष शेख शादुल होनवडजकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याअध्यक्ष जयभीम सोनकांबळे, लक्ष्मण सोमवारे, मादसवाड कैलास, कदम जीएस, युवराज चौव्हान, शिंदे आर डी, शिंपाळे आनंदराव आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


         यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया सेल जिल्हाअध्यक्ष शादुल होनवडजकर यांनी म्हंटले की जर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व अजितदादा पवार यांच्या वरील सध्याचे महाराष्ट्र सरकार व ईडी ने यांच्या वरील गुन्हे परत नाही घेतल्यास मुखेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठया संख्येने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल .