जगात तोच सूखी ज्याचे आरोग्य चांगले–प्रा. डॉ.रामकृष्ण बदने

कंधार नांदेड जिल्हा
    कंधार–देही आरोग्य नांदते lभाग्य नाही या परते l आरोग्याला इंग्रजीमध्ये HEALTH असे म्हणतात.हेल्थ या इंग्रजी शब्दाचा अल्फाबेटिकल अर्थ बघितला तर  H-म्हणजे ह्याबीट(सवय) E-म्हणजे  एक्झरसाईज (व्यायाम)A-म्हणजे ॲटीट्युड( दृष्टिकोन) L-म्हणजे लव्ह ( प्रेम)  T-म्हणजे टेंशन फ्री लाईफ H- म्हणजे हॅपिनेस असा आहे. वरील सर्व बाबींवर आपले आरोग्य अवलंबून आहे. तेंव्हा विद्यार्थ्यांनी वरील बाबी आपल्या आयुष्यामध्ये उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन  ग्रामीण महाविद्यालय वसंत नगर ता. मुखेड येथिल प्रा. डॉ. रामकृष्ण  बदने यांनी कंधार  कॉलेज ऑफ फार्मसी ता. कंधार जि.नांदेड येथे जागतीक फार्मसी डे च्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजच्या एच.ओ.डी.वैशाली कदम मॅडम या होत्या.  यावेळी प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी भविष्यात विद्यार्थ्यांनी समाजाला आरोग्याची चांगली सेवा द्यावी असे आवाहन केले व नवनवीन कौशल्य आत्मसात करून सामाजिक व शारीरिक आरोग्य अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ही केले व या दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी स्वतः वर, ग्रंथावर, अभ्यासावर मनातून प्रेम करावे. परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे. यावेळी त्यांनी

आई-वडिलांच्या सेवेचे महत्त्व विस्ताराने विशद केले.

अध्यक्षीय समारोप करताना कॉलेजच्या एच.ओ.डी. वैशाली कदम मॅडम म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी समाजात  भविष्यातआरोग्याची सेवा प्रामाणीकपणे द्यावी.   तसेच या वयात अभ्यास करून आपले ध्येय गाठले पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंगोले सर यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठी मागची भूमिका विशद केली व हा फार्मसी डे केव्हा पासून व कशासाठी साजरा केला जातो हे विस्ताराने सांगितले .सूत्रसंचलन मंगेश इंगळे सर यांनी तर आभार पल्लवी मॅडम यांनी मानले कार्यक्रमास गणवीर मॅडम, अश्विनी मॅडम, केंद्रे मॅडम, वर्षा मॅडम,शितल मॅडम, आंबेकर सर, पांचाळ सर,केंद्रे सर व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.