भाजपाकडुन कोण ? रामदास पाटील की डॉ. तुषार राठोड चर्चेला उधाण !

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड राजकारण
ज्ञानेश्वर डोईजड
                 मुखेड – कंधार मतदार संघात उमेदवारीच्या चर्चेला उधान आले असुन सर्वात जास्त चर्चा भाजपाच्या उमेदवारी होत असुन भाजपाकडुन हिंगोलीचे मुख्याधिकारी रामदास पाटील की विद्यमान आ. डॉ. तुषार राठोड कोणाला तिकीट मिळणार अशी चर्चा गावागावात व कटयावर रंगत आहे.
भाजपा – सेनेच्या युतीकडे सुध्दा सर्वांचे लक्ष असुन दोन दिवसात फॉर्म भरण्याची तारीख असुन अद्याप कोणत्याच पक्षाचा उमेदवार मात्र ठरला नाही. कॉग्रेसकडुन ही कोणत्याच उमेदवारीची घोषणा झाली नसली तरी माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर, शेषेराव चव्हाण, भाऊसाहेब पाटील मंडलापुर, स्वप्नील चव्हाण यांची नावे आहेत.