शरद पवार यांच्यावर ईडी ने केला गुन्हा दाखल

ठळक घडामोडी राजकारण

मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी (MAHARASHTRA STATE CO BANK SCAM) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ED case) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे.  याआधीच अजित पवार यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यास हायकोर्टाने बजावलं होतं. 

      आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (MAHARASHTRA STATE CO BANK SCAM) आर्थिक गैरव्यवहार चर्चेत आला होता. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्याने बँकेला फटका बसला.

या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवारांचं नाव आघाडीवर असताना, आता शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

काय आहे प्रकरण?

काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार चर्चेत आला होता. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्याने बँकेला फटका बसला.

25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता.

तर 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केलं होतं. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावं होती.