गोजेगाव येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची प्रात्यक्षीक दाखवुन जनजागृती

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
दत्ता पाटील माळेगावे

 

               मुक्रमाबाद :मतदारांना ईव्हीएम व्ही व्हिपॅॅट मशीनची माहिती व्हावी व संभ्रम दुर व्हावा त्याची हाताळणी  मतदान कसे करावे याबाबत परिसरात प्रत्येक गावातील मतदान केंद्रावर प्रशासनाकडुन जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.यायाच एक भाग म्हणुन दि.१५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता उंद्री(प.दे)ता मुखेड येथील ग्रामपंचायतीच्या समोर याबाबतचे प्रात्यक्षीक व मार्गदर्शन ग्रामंस्थाना देण्यात आले.यावेळी महसुल व निवडणुक विभागाचे कमृचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्क्ष्वभुमीवर मतदारांना ईव्हीएम व्ही व्हीपॅट मशीनची माहिती व त्याची हाताळणी करुन प्रत्यक्षात मतदान कसे करावे मिशनवर मतदान केल्यावर काही क्षणातच मतदान कोणास केले आहे             हे  मतदान करणाऱ्या व्यक्तीला दिसणार आहे.त्यामुळे संभ्रम दुर होउन   मतदान प्रक्रीया पारदर्शक पध्दतीने व्हावी यासाठि परिसरात सर्वच मतदान केंद्रावर जनजागृती अभियान राबविले जात आहे.

                यावेळी टीम प्रमुख मंडळ अधिकारी मुडे एस.बी,तलाठी तोतरे एस.जी,लोकरे सुशील,डि.एम.पाटील, गोजेगाव चे तलाठी पुष्पलवार बि.एम,क्रषीसहाय्यक जि.एन.पिटले,पोलीस कर्मचारी एम.एम.गायकवाड, एस.जी.बनसोडे, विठ्ठलराव पाटील गोजेगावकर, रामदास पाटील माळेगावे, श्रीनिवास पाटील, गजानन पाटील, शिवाजी गायकवाड, मारोती वाघमारे, शंकरराव सुर्यवंशी, पत्रकार दत्तात्रय माळेगावे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.